AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NTA NEET Phase 2 : नीट फेस 2 परीक्षेची नोंदणी सुरु, 10 ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशनची संधी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश चाचणी अर्थात नीट यूजी परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

NTA NEET Phase 2 : नीट फेस 2 परीक्षेची नोंदणी सुरु, 10 ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशनची संधी
NEET UG Answer Key
| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 8:14 AM
Share

NTA NEET Phase 2  नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश चाचणी अर्थात नीट यूजी परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. तुम्ही neet.nta.nic.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) नेही या संदर्भात नोटीस जारी केली आहे. नीट दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी 10 ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार पहिल्या टप्प्यात भरलेल्या अर्जात बदल करू शकतात. एनटीएच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या नोंदणी केली आहे आणि परीक्षा शुल्क देखील जमा केले आहे त्यांना नीट यूजी 2021 मधील अर्जाचा दुसरा टप्पा भरावा लागेल. अधिकृत सूचनेनुसार, दुसरा टप्प्यातील माहिती नोंदण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही.

अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी

नीट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पहिल्या टप्प्यातील अर्जामध्ये कोणतीही सुधारणा करायची असेल. एनटीएकडून उमेदवारांना लिंग, राष्ट्रीयत्व, ईमेल, श्रेणी, उपश्रेणी आणि अकरावी आणि बारावीच्या शैक्षणिक तपशिलात सुधारणा करण्याची संधी देईल. या वर्षीच्या ताज्या अपडेटनुसार, नीट 2021 अर्ज फॉर्म दोन टप्प्यात विभागला गेला आहे जेणेकरून उमेदवाराचा डेटा लवकर सबमिट होईल. नीट यूजी 2021 निकालाच्या तारखेपूर्वी उमेदवारांनी आवश्यक तपशील भरून नीट फेज 2 नोंदणी फॉर्म 2021 सादर करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार दुसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी करण्यास चुकला तर त्याची उमेदवारी रद्द होईल आणि अशा उमेदवारांचा नीट परीक्षेचा निकाल जारी केला जाणार नाही.

16 लाख विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

नीट यूजी परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एनटीएकडून अंतिम उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षा आयोजित करण्यात येते. 55 हजार जागांसाठी जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानं या परीक्षेतील स्पर्धा तीव्र असते.

नीट यूजी परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये

गेल्या वर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला एकूण 13.66 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,71,500 विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू या 11 भाषांमध्ये घेण्यात आली आहे.

इतर बातम्या:

NEET परीक्षा रद्द करा, तामिळनाडू प्रमाणं मेडिकल प्रवेशाचा निर्णय घ्या; काँग्रेसची मागणी, उद्धव ठाकरेंना पत्र

NEET PG Admit Card : नीट पीजी परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

NEET Phase 2 Registration Started for National Eligibility cum Entrance Test by NTA

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.