AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCERT : NCERT पुस्तकातील कथेवरून वाद ! NCPCR कडून तक्रार दाखल

ही कथा प्रसिद्ध करण्यात आली आणि यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आक्षेप घेतला असून यासंदर्भात एनसीईआरटीकडून उत्तर मागवण्यात आलं आहे.

NCERT : NCERT पुस्तकातील कथेवरून वाद ! NCPCR कडून तक्रार दाखल
NCERT पुस्तकातील कथेवरून वाद
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 1:46 PM
Share

नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकात हर्ष मंदर यांनी लिहिलेल्या कथेवरून वाद निर्माण झालाय. ही कथा प्रसिद्ध करण्यात आली आणि यावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आक्षेप घेतला असून यासंदर्भात एनसीईआरटीकडून उत्तर मागवण्यात आलं आहे. एनसीईआरटीच्या नववीच्या  पुस्तकात हर्ष मंदर (Harsh Mander) यांनी एक धडा लिहीला आहे ज्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. एका आठवड्यात या प्रकरणावर उत्तर द्यावं लागणार असल्याचं एनसीईआरटीकडून सांगण्यात आलंय.

NCPCR च्या वतीने अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी हा आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात बोलताना प्रियांक कानुनगो म्हणाले कि, आयोगाला ‘Moments’ या इंगजी पुस्तकात प्रकाशित झालेल्या ‘ Weathering the storm in Ersama’ या कथेविरोधात तक्रार आली होती ज्याचे लेखक हर्ष मंदर आहेत.

का आहे आक्षेप ?

देशात बालगृह चालवताना मनी लॉंडरिंगचा आरोप असणाऱ्या व्यक्तीने लिहिलेली कथा कशी छापली जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. हर्ष मंदर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) चौकशी सुरु आहे.

‘त्या’ दोन बालगृहांशी हर्ष मंदर यांचा संबंध

NCPCRने गेल्याच वर्षी जुलैमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाकडे दोन बालगृहांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या बालगृहांवर अनियमिततेचा आरोप करण्यात आला होता या दोन्ही बालगृहांशी हर्ष मंदर यांचं नाव जोडलेलं होतं. याशिवाय आयोगाने A Home On The Street आणि Paying For His Tea या दोन कथेंवर देखील आक्षेप घेतला आहे. बालसंगोपण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने या कथेत दुर्लक्ष करण्यात आल्याचं आयोगानं म्हटलंय.

इतर बातम्या :

Elon Musk चा स्वॅगच भारी, आधी ट्विटरचे शेअर खरेदी, आता म्हणतो एडिट बटण पाहिजे

सलमान खानला दिलासा; पत्रकाराला धमकी प्रकरणी कोर्टात हजर राहण्यापासून सूट

Samruddhi Mahamarga : समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होणार, tv9मराठीला माहिती

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.