
NIRF Ranking 2025 Out : केंद्रिय शिक्षण खात्याने (Ministry of Education) आज 4 सप्टेंबर 2025 रोजी NIRF Ranking 2025 जाहीर केले. देशभरातील टॉपची महाविद्यालये आणि विद्यापीठांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. नवी दिल्लीतील भारत मंडपममधील एका खास कार्यमक्रात ही यादी जाहीर करण्यात आली. यंदा पण या यादीत IIT मद्रास टॉपवर आहे. 2025 मधील देशातील टॉप महाविद्यालय आणि विद्यापीठांबाबतची रॅकिंग यादी NIRF च्या अधिकृत संकेतस्थळावर nirfindia.org वर तपासता येईल. या ठिकाणी 17 श्रेणीतील सर्वोत्तम महाविद्यालयं आणि विद्यापीठं तपासता येईल. या आधारे भारतीय शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता प्राप्त संस्थांची यादी अधिकृतपणे समोर येते आणि पालकांना, विद्यार्थ्यांना त्यामध्ये प्रवेशाची प्रेरणा मिळते.
NIRF Ranking 2025 List
आयआयटी मद्रास
आयआयएससी बेंगळुरू
आयआयटी मुंबई
आयआयटी दिल्ली
आयआयटी कानपूर
आयआयटी खरगपूर
आयआयटी रुडकी
एम्स, दिल्ली
जेएनयू, नवी दिल्ली
बीएचयू,वाराणसी
NIRF Ranking 2025 List : टॉप विद्यापीठांची यादी
NIRF Ranking 2025 List : टॉप कॉलेज
विद्यार्थी आणि पालक हे थेट NIRF च्या संकेतस्थळावर जाऊन यादी पाहु शकता