इंजिनिअर किंवा डॉक्टर नाही, ‘या’ मार्गांनी कमवा बक्कळ पैसे, 5 टॉप करीयर ऑप्शन घडवतील तुमचं आयुष्य
फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच नाही तर, 'या' पाच मर्गांनी कमवा गडगंज पैसा... 'हे' 5 टॉप करीयर ऑप्शन तुमच्या आयुष्याला देतील नव्या दिशा..., कोणत्या क्षेत्रात करीयर करणं योग्य...

पूर्वी डॉक्टर आणि इंजिनियर झाला म्हणजे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार असं होतं. पण आता स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक मार्ग आहे. ज्यामुळे चांगले पैसे देखील मिळतात आणि ओळख देखील तयार होते. आजच्या काळात जरी तुम्ही आयआयटी किंवा नीट उत्तीर्ण झाला नसला तरी निराश होण्याची गरज नाही. आजच्या युगात, असे अनेक करिअर आहेत जे कौशल्य आणि सर्जनशील विचारांना प्राधान्य देतात. चला जाणून घेऊया त्या टॉप 5 करिअरबद्दल…
सांगायचं झालं तर, इंजीनियरिंग आणि मेडिकल यांना देशात कायम आव्वल मानलं जातं. पण आता काळ बदलला आहे. इंजीनियरिंग आणि मेडिकल न करता देखील लोकं आता लाखो रुपये कमावत आहे. आज अशा करीयरबद्दल जाणून घेऊ, ज्यांमुळे तुमच्या करीयरला नवीन दिशा मिळेल.
UX/UI डिजाइन : आता वेबसाइट किंवा अॅप फक्त काम करण्यासाठी नाही, तर त्यांचा लूक देखील चांगला पाहिजे. UX (यूजर एक्सपीरियंस) आणि UI (यूजर इंटरफेस) डिझायनर्स हेच करतात. टेक कंपन्यांपासून ते ई-कॉमर्स आणि फिनटेक स्टार्टअप्सपर्यंत सर्वत्र त्यांची आवश्यकता आहे. या श्रेत्रात सुरुवातीचा पगार दरवर्षी 6 से 10 लाख रुपये असू शकतो आणि तज्ज्ञ झाल्यावर 20 ते 25 लाख रुपये कमवू शकतो.
डिजिटल मार्केटिंग : आजच्या जगात कंपन्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांना डिजिटल स्पेसची गरज भासते. एसइओ, पेड जाहिराती, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि सोशल मीडिया ट्रेंड समजून घेणाऱ्या डिजिटल मार्केटर्सची मोठी मागणी आहे. या क्षेत्रात फ्रेशर्सना 5 ते 8 लाख रुपये पगार मिळू शकतो आणि तज्ञ पातळीवर ते 20 लाख रुपयांपर्यंत कमवू शकतात.
एथिकल हैकिंग आणि सायबर सुरक्षा : जग ऑनलाइन होत असताना, सायबर सुरक्षेची मागणी देखील वाढत आहे. कंपन्या नैतिक हॅकर्सना कामावर ठेवतात जेणेकरून ते खऱ्या हॅकर्सच्या आधी त्यांच्या सिस्टममधील कमतरता पकडू शकतील.या क्षेत्रात फ्रेशर्सना 8 ते 10 लाख रुपये पगार मिळू शकतो आणि तज्ज्ञ पातळीवर ते 30 लाख रुपयांपर्यंत कमवू शकतात.
एनीमेशन आणि गेम डिझाइन : ओटीटी, गेमिंग ॲप्स आणि व्हर्चुअल रियलिटीने एनीमेशन आणि व्हीएफएक्स इंडस्ट्रीसा उच्च शिखरावर नेलं आहे. यामध्ये देखील उत्तम करीयर घडू शकतं. सुरुवाताली जर तुम्ही 4 ते 8 लाख रुपये कमवू लागलात आणि तुमचा पोर्टफोलिओ चांगला असेल तर तुम्ही 15 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमवू शकता.
सायकॉलोजी आणि मानसिक आरोग्य : आता लोक मानसिक आरोग्याबद्दल जागरूक होत आहेत. शाळा, कार्यालय, रुग्णालय किंवा खाजगी थेरपी क्लिनिक असो, सर्वत्र मानसशास्त्रज्ञांची मागणी आहे. बीए किंवा एमए सायकॉलॉजीसह कौन्सिलिंग आणि थेरपीमध्ये डिप्लोमा करता येतो. वरिष्ठ थेरपिस्ट किंवा प्रॅक्टिशनरसाठी पगार 4 ते 6 लाख रुपयांपासून सुरू होतो, जो 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत जातो.
