AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचं मोठं यश, शिष्यवृत्ती परीक्षेत मुंबई विभागातून मिळवलं अव्वल स्थान

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत मुंबईत मानाचं स्थान मिळवलं आहे. या शाळेत शिकणाऱ्या वेदांश खानोलकर याने मुंबई विभागातून पहिल्या येण्याचा मान मिळवला आहे.

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचं मोठं यश, शिष्यवृत्ती परीक्षेत मुंबई विभागातून मिळवलं अव्वल स्थान
दहिसरच्या विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचं मोठं यश, शिष्यवृत्ती परीक्षेत मुंबई विभागातून मिळवलं अव्वल स्थानImage Credit source: TV9 Network
| Updated on: Jul 06, 2026 | 5:19 PM
Share

दहिसरच्या विद्या मंदिरच्या यशात मानाचा तुरा गेली अनेक वर्षे शालांत परीक्षेत 100 टक्के निकाल देणारी शाळा म्हणून विद्या प्रसारक मंडळाच्या विद्या मंदिर शाळेचे नाव पश्चिम उपनगरात अग्रक्रमाने घेतले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि शाळा प्रशासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. त्यामुळे शाळेचा निकाल नेहमी उंचावत राहिला आणि दहिसरवासियांचा आपल्या शाळेचा अभिमान वाढत गेला. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या विद्या मंदिर शाळेत यंदा मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा 2025-2026 मध्ये विद्या मंदिर शाळेतील वेदांश सचिन खानोलकर याने इयत्ता 5 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 264 गुण मिळवत मुंबई जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. ट्विशा निलेश पाटील हिने 244 गुण मिळवून इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतून पहिला येण्याचा मान मिळवला आहे.

दांश खानोलकर यांच्या या देदीप्यमान यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राथमिक शाळेपासून विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याने अगदी लहान वयातच शाळेच्या नावाचा लौकिक वाढवण्यात हातभार योगदान दिले आहे. वेदांश आणि ट्विशा याच्या यशाचे अभिनंदन करताना संस्थेचे कार्यवाह राहुल केळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक वर्गाचे कौतुक केले.

शाळेतील शिक्षकांनी वर्षभर विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात भर पडावी यासाठी मेहनत घेतली, नियमित सराव परीक्षा आणि तज्ज्ञ लोकांनी केलेलं मार्गदर्शन आणि अर्थातच विद्यार्थ्याची मेहनत याचे हे फलित असल्याचेही त्यांनी नमूद केले. इयत्ता 5 वी आणि 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण 21 आणि 16 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थ्यांनी अशीच नवनवी शिखरे गाठावीत यासाठी शिक्षक मेहनत घेत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संचालक मंडळ पूर्ण ताकदीनिशी विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही कार्यवाह यांनी दिली.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...