AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG Result 2021 : नीट यूजी परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाकडून मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाला स्थगिती देत निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली आहे. नीट यूजी परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या 16 लाख विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

NEET UG Result 2021 : नीट यूजी परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाकडून मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती
सर्वोच्च न्यायालय
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 12:11 PM
Share

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टानं नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टानं दिलेली स्थगिती उठवली आहे. मुंबई हायकोर्टानं दोन विद्यार्थ्यांना दिलासा देत त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश एनटीएला दिले होते. परीक्षा केंद्राच्या चुकीमुळं विद्यार्थ्यांना पेपर एका कोडचा आणि उत्तरपत्रिका एका कोडची मिळाली होती. मुंबई हायकोर्टानं विद्यार्थ्यांच्या याचिकेची दखल घेत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाला स्थगिती देत निकाल जाहीर करण्यास परवानगी दिली आहे. नीट यूजी परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या 16 लाख विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं दोन विद्यार्थ्यांच्या तक्रारीचं निराकरण करण्याची तयारी दर्शवली आहे. नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास परवानगी देताना दिवाळीच्या सुट्टीनंतर म्हणजेच 12 नोव्हेंबरला या संदर्भात अधिक सुनावणी करु, असं न्यायालयानं सांगितलं आहे.

2 विद्यार्थ्यांसाठी 16 लाख विद्यार्थ्यांचा निकाला थांबवायला नको

2 विद्यार्थ्यांसाठी जे काही करता येईल ते आपण करु, असं न्यायमूर्ती नागेश्वर राव म्हणाले. दोन विद्यार्थ्यांसाठी आपण निकाल थांबवू शकत नाही, असं मत कोर्टाकडून मांडण्यात आलं. विद्यार्थ्यांसोबत जे काही चुकीचं घडलं असेल ते दुरुस्त करण्याची तयारी करावी आणि निकाल जाहीर करावेत, असं कोर्टाकडून सांगण्यात आलं.

नीट यूजी परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा

सुप्रीम कोर्टानं मुबंई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती नीट यूजी परीक्षेचा मार्ग मोकळा केला आहे. न्यायमूर्ती, एल.नागेश्वर राव, न्यायमूर्ती संजीव खन्ना, आणि न्यायमूर्ती बी.आर.गवई यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतला.

NEET 2021 निकाल कसा पाहायचा

स्टेप 1 : अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in ला भेट द्या. स्टेप 2 : होमपेजवरील निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3 : तुमचा रोल नंबर, पासवर्ड आणि जन्मतारीख टाका. स्टेप 4 : स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा. स्टेप 5 : तसेच निकालाची प्रिंट आऊट आपल्याकडे ठेवा.

इतर बातम्या:

NEET UG Result 2021: नीट यूजी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार, रिझल्ट कुठं पाहणार?

NTA NEET Phase 2 : नीट फेस 2 परीक्षेची नोंदणी सुरु, 10 ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशनची संधी

Supreme Court stay the judgement of Bombay High court and pave the way for declaration of NEET UG Result 2021

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.