AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ, आता या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार

2 जून 2025 रोजी सायंकाळपर्यंत एकूण 10 लाख 85,851 विद्यार्थ्यांनी 11वी च्या कॉलेज प्रवेशाची नोंदणी केली आहे. इयत्ता 11 वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी विद्यार्थी शासकीय संकेतस्थळावर लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ, आता या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार
| Updated on: Jun 02, 2025 | 9:39 PM
Share

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजात जायचे वेध लागले आहेत. त्यासाठी कॉलेज निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे. आधी इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीकरीता दि. 26 ते 3 जून 2025 हा कालावधी दिला होता. आता 6 मे 2025 च्या शासन निर्णयात काही सुधारणा करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. 31 मे रोजीच्या पत्रान्वये आता  11 वी प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक ( माध्यमिक ) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी म्हटले आहे.

असा झाला कोट्यात बदल पहा

या पत्रानुसार इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना 10 टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय संलग्न संस्थांच्या शाळाकरीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यांमध्ये एक यूनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.

इन-हाऊस कोट्यातील पसंतीक्रम बदलता येणार

या बदलानुसार आता सरकारने संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक तसेच विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा याकरीता विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक 3 जून ऐवजी आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 पर्यंत करण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

प्रवेशासाठी अधिकृत संकेत स्थळ पाहा-

इयत्ता 11 वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी विद्यार्थी नोंदणी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणेच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

2 जूनपर्यंत 10 लाख 85 हजाराहून अधिक नोंदणी

आज दि. 2 जून 2025 रोजी सायंकाळपर्यंत एकूण 10 लाख 85 हजार 851 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

पुणे विभाग- 1,87,925

मुंबई विभाग- 2,65,900

कोल्हापूर विभाग- 1,07,012

छत्रपती संभाजीनगर विभाग- 1,00,040

नाशिक विभाग- 1,12,108

नागपूर विभाग- 95,210

अमरावती विभाग- 98,359

लातूर विभाग- 58,586 आणि इतर- 61,712

अधिक माहितीसाठी ई-मेल आयडी – support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन क्रमांक 8530955564 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.