NEET UG 2022 : ए रिक्स नहीं लेने का रे बाबा! घरचे विचारणार त्याआधी फॉर्म भरलेला बरा!! शेवटची तारीख

या परीक्षेसाठी तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर तुम्ही लगेच नीट neet.nta.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊन स्वत:ची नोंदणी करू शकता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे ही परीक्षा घेतली जाते. यावेळी एनईईटी यूजी 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. देशातील विविध शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

NEET UG 2022 : ए रिक्स नहीं लेने का रे बाबा! घरचे विचारणार त्याआधी फॉर्म भरलेला बरा!! शेवटची तारीख
नीट परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख
Image Credit source: IBTimes India
रचना भोंडवे

|

May 20, 2022 | 11:02 AM

नीट परीक्षेसाठी अर्ज (NEET UG 2022 Application) करण्याची शेवटची तारीख (Last Date) आज म्हणजेच 20 मे आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. आज रात्री 9 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज भरू शकतात. त्याचबरोबर या परीक्षेसाठी अर्ज शुल्क भरण्याची मुदत 20 मे 2022 च्या रात्री 11.50 पर्यंत आहे. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical Colleges) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली होती. ही तारीख 15 मे वरून 20 मे 2022 करण्यात आली होती. या परीक्षेसाठी तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर तुम्ही लगेच नीट neet.nta.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊन स्वत:ची नोंदणी करू शकता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे ही परीक्षा घेतली जाते. यावेळी एनईईटी यूजी 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. देशातील विविध शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

NEET UG 2022 साठी नोंदणी कशी करावी

  • सर्वप्रथम उमेदवारांना neet.nta.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
  • वेबसाइटच्या होम पेजवर त्यांना एनईईटी यूजी 2022 च्या नोंदणीची लिंक मिळेल, ज्यावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर तुम्ही तपशील टाका. यानंतर लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
  • आता तुमच्या क्रेडेन्शियल्समधून लॉग इन करा आणि नंतर अर्ज भरा. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी अर्ज शुल्क जमा करा आणि फॉर्म फायनल सबमिट करा. त्याची प्रिंट काढून सोबत ठेवा.

NEET UG 2022 चे अर्ज शुल्क

एनईईटी यूजीसाठी अर्ज करणार् या सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1600 रुपये शुल्क भरावे लागेल. ईडब्ल्यूएस, ओबीसी नॉन क्रिमीलेयर प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 1500 रुपये आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि थर्ड जेंडर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 900 रुपये आहे.

नीट परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं

एनईईटी यूजी परीक्षा यंदा ऑफलाइन पद्धतीनं घेतली जाणार आहे. ही परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. दरवर्षी सुमारे 15 लाख वैद्यकीय उमेदवार या परीक्षेला बसतात. यंदाही आणखी उमेदवार यात सहभागी होऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये एमबीबीएस किंवा बीडीएस अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठीही एनईईटी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

हे सुद्धा वाचा

या अभ्यासक्रमांना एनईईटी यूजीच्या माध्यमातून प्रवेश मिळतो

नीट यूजी परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, आयुष पदवी, बीएस्सी नर्सिंग, बीएस्सी लाइफ सायन्सेस आणि व्हेटर्नरी मेडिसीन या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट पीजी परीक्षा घेतली जाते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें