पीरियड्सच्या काळात विद्यार्थीनींना मिळणार सुट्टी; ‘या’ राज्यातील विद्यापीठाचा मोठा निर्णय

नुकताच एका विद्यापीठाने अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. आता या निर्णयाचे जोरदार काैतुक केले जातंय. आता विद्यार्थीनींना पीरियड्समध्ये सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी घेण्यासाठी एका अर्जाची प्रक्रिया विद्यार्थीनींना पूर्ण करावी लागणार आहे. अखेर हा निर्णय नेमका काय आणि कोणत्या विद्यापीठाने हा निर्णय घेतला हे जाणून घ्या.

पीरियड्सच्या काळात विद्यार्थीनींना मिळणार सुट्टी; 'या' राज्यातील विद्यापीठाचा मोठा निर्णय
students
Follow us
| Updated on: Apr 12, 2024 | 5:31 PM

नुकताच एका विद्यापीठाने अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. आता विद्यापीठाच्या या निर्णयाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत मागणी केली जातंय की, पीरियड्समध्ये महिलांना आॅफिसला सुट्टी मिळायला हवी. हेच नाही तर काही देशांमध्ये पीरियड्समध्ये महिलांना सुट्टी देखील मिळते. आता एका राज्यातील विद्यापीठाने मोठा निर्णय घेत मुलींना पीरियड्सच्या सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. आता या निर्णयाचे स्वागतही केली जातंय. मात्र, या निर्णयासोबतच काही अटीही लागू करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थीनींना पीरियड्सच्या काळात सुट्टी देण्याचा निर्णय चंडीगडच्या पंजाब यूनिवर्सिटीकडून घेण्यात आला आहे. पीरियड्सच्या काळात विद्यार्थीनींना एक दिवसाची सुट्टी मिळणार आहे. यासाठी विद्यार्थीनींना एक अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थीनींना एका महिन्यात एक सुट्टी ही पीरियड्सच्या काळात मिळणार आहे. मात्र, फक्त वर्ग सुरू असतानाच ही सुट्टी मिळेल.

कोणत्याही विद्यार्थीनी ही सुट्टी परीक्षेच्या काळात घेऊ शकणार नाहीयेत. कोणत्याही कारणाने विद्यार्थीनींना पीरियड्सच्या सुट्टीमध्ये वाढ करता येणार नसल्याचे देखील अगोदरच स्पष्ट करण्यात आले. विद्यापीठाकडून हा नियम 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी लागू करण्यात आलाय. यामुळे पीरियड्सच्या काळात विद्यार्थीनींना मोठा दिलासा मिळणार हे नक्की आहे.

पंजाब यूनिवर्सिटीच्या अगोदर 2023 मध्येच केरळच्या कोचीन यूनिवर्सिटीने हा निर्णय घेतलाय. कोचीन यूनिवर्सिटीमध्ये विद्यार्थीनींना पीरियड्समध्ये सुट्टी मिळते. आता पंजाब यूनिवर्सिटीच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मात्र, ही सुट्टी प्रत्येक महिन्याला घेण्यासाठी विद्यार्थीनींना एक अर्ज करावा लागणार आहे.

कोचीन, पंजाब यूनिवर्सिटीसोबतच हैद्राबाद आणि अजून काही यूनिवर्सिटींनी अशाच प्रकारचा निर्णय हा घेतलाय. अजूनही काही यूनिवर्सिटींकडून अशाप्रकारचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेकदा मुलींना खूप त्रास होत असताना देखील पीरियड्सच्या काळात महाविद्यालयात जावे लागते, तेच टाळण्यासाठी हे निर्णय घेतले जात आहेत.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.