AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१० – ११ जुलै रोजी केंद्रीय विद्यापीठांची दोन दिवसीय कुलगुरु परिषद, या १० विषयांवर चर्चा

गुजरातमधील केवडिया येथे केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची दोन दिवसांची परिषद भरणार आहे, ज्यामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक उच्च शिक्षण अधिकारी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, भविष्यातील नोकरीच्या गरजांनुसार अभ्यासक्रमांची रचना आणि डिजिटल शिक्षण यासह अनेक विषयांवर चर्चा केली जाईल.

१० - ११ जुलै रोजी केंद्रीय विद्यापीठांची दोन दिवसीय कुलगुरु परिषद, या १० विषयांवर चर्चा
| Updated on: Jul 09, 2025 | 5:28 PM
Share

शिक्षण मंत्रालयाने १० ते ११ जुलै दरम्यान गुजरातच्या केवडियात केंद्रीय विद्यापीठांच्या दोन दिवसीय कुलगुरु परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मझुमदार आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभाग घेणार आहेत. केंद्रीय विद्यापीठांच्या प्रमुखांना संस्थात्मक प्रगतीचा आढावा घेता यावा आणि एकत्रितपणे पुढील मार्ग ठरवता यावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. दोन दिवसांच्या या चर्चासत्रात तीन प्रमुख बाबींवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये धोरणात्मक संरेखन, समवयस्क शिक्षण आणि ज्ञानाची देवाणघेवाण, भविष्य नियोजन आणि तयारी यांचा समावेश आहे.

स्ट्रॅटेजिक अलायनमेंट ( धोरणात्मक संरेखन ) म्हणजे केंद्रीय विद्यापीठे धोरणाच्या पुढील टप्प्यातील उद्दिष्टांशी सुसंगत आहेत याची खात्री करणे.त्याच वेळी, पीअर लर्निंग आणि नॉलेज एक्सचेंजचे उद्दिष्ट संस्थात्मक नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे, सामायिक आव्हानांवर शैक्षणिक नेत्यांमध्ये सक्षम वातावरण आणि संवाद निर्माण करणे आहे, तर फॉरवर्ड प्लॅनिंग आणि रेडीनेसचे उद्दिष्ट २०४७ च्या जागतिक शैक्षणिक परिस्थितीसाठी संस्थांना तयार करणे हे आहे.

या दोन दिवसीय परिषदेत उच्च शिक्षणाचे प्रमुख पैलू उदाहरणार्थ शिकवणे/शिकणे, संशोधन आणि प्रशासन या विषयावर दोन दिवसांत १० विषयानुरुप सत्रे होतील, जी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रमुख पिलर्सशी सुसंगत असतील.उदा. समता, जबाबदारी, गुणवत्ता, प्रवेश आणि अफोर्डेबिलीटी नुसार ही सत्रे असतील.

कोणत्या कोणत्या विषयांवर चर्चा होणार ?

४ वर्षीय अंडर-ग्रॅज्युएट प्रोग्रामवर ध्यान केंद्रित करतानाच NHEQF/NCrF च्या अंडरस्टँडिंग आणि इंप्लिमेंटेशन

कामाचे भविष्य- भविष्यातील नोकरीतील गरजांनुसार कोर्सेसचे अलाईनमेंट

डिजिटल शिक्षण- स्वयं (SWAYAM), स्वयं प्लस (SWAYAM Plus), AAPAR क्रेडीट ट्रान्सफरवर लक्ष पुरवणे

यूनिव्हर्सिटी गर्व्हेर्नेंस सिस्टम- समर्थ (SAMARTH)

उच्च शिक्षण संस्थांत समानतेचा पुरस्कार करणे – समावेशी आणि समतापूर्ण वातावरणाला प्रोत्साहन देणे

भारतीय भाषा आणि भारतीय नॉलेज सिस्टममध्ये शिक्षण, भारतीय भाषा पुस्तक योजना

ANRF, CoE, PMRF सह रिसर्च एणड इन्होवेशन

रँकिंग आणि मान्यता सिस्टीम

भारतात शिक्षणासह इंटरनॅशनलायझेशन

फॅकल्टी डेव्हलपमेंट- मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग प्रोग्रॅम

यात कोणत्या युनिव्हर्सिटी सहभाग घेतील ?

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या संस्थांमध्ये दिल्ली विद्यापीठ, हरियाणा केंद्रीय विद्यापीठ, आसाम विद्यापीठ, हेमवती नंदन बहुगुणा गढवाल विद्यापीठ, राजस्थान केंद्रीय विद्यापीठ, काश्मीर केंद्रीय विद्यापीठ, विश्वभारती, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ (IGNTU), सिक्कीम विद्यापीठ, त्रिपुरा विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), अलाहाबाद विद्यापीठ आणि इतर अनेक विद्यापीठे यांचा समावेश आहे.

कुलगुरूंच्या या परिषदेमुळे NEP 2020 च्या अंमलबजावणीच्या पुढील टप्प्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप तयार करण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे. या परिषदेचे निकाल भारतातील उच्च शिक्षणाचे भविष्य घडवण्यात आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या देशाच्या सामूहिक दृष्टिकोनाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.