AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Final Result: पोरगी शिकली,ऑफिसर झाली! महाराष्ट्राची कन्या टॉप 15 मध्ये, बघा इतर टॉप 15

यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेला बसणारे उमेदवार पीडीएफ मध्ये आपलं नाव किंवा आपला नोंदणी क्रमांक शोधू शकतात. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. ही वैयक्तिक चाचणी 5 एप्रिल ते 25 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. उमेदवार रोल नंबर सर्च करून आपला निकाल तपासू शकतात.

UPSC Final Result: पोरगी शिकली,ऑफिसर झाली! महाराष्ट्राची कन्या टॉप 15 मध्ये, बघा इतर टॉप 15
पोरगी शिकली,ऑफिसर झाली! महाराष्ट्राची कन्या टॉप 15 मध्येImage Credit source: TV9 marathi
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 30, 2022 | 2:47 PM
Share

यंदा श्रुती शर्माने यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक (Shruti Sharma UPSC Topper) पटकावला आहे. महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. तिची ऑल इंडिया रँक 13 वी आहे. टॉप 15 मध्ये दिसणारं हे एवढं एकच नाव आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर (UPSC Final Result) करण्यात आला आहे. उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला (Official Website UPSC) भेट देऊ शकतात. यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेला बसणारे उमेदवार पीडीएफ मध्ये आपलं नाव किंवा आपला नोंदणी क्रमांक शोधू शकतात. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. ही वैयक्तिक चाचणी 5 एप्रिल ते 25 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. उमेदवार रोल नंबर सर्च करून आपला निकाल तपासू शकतात.

एकूण 685 उमेदवारांची निवड

2021 मध्ये यूपीएससीनं मुख्य परिक्षेचं आयोजन केलं होतं तर जानेवारी 2022 मध्ये उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्यांची निवड झालेली आहे, ते उमेदवार IAS, IPS, IFS आणि केंद्रीय सेवेतल्या A आणि B ग्रुपमध्ये प्रशासकिय सेवा देतील. एकूण 685 उमेदवारांची निवड झालीय. त्यात जनरल कॅटेगरीचे 244, ईडब्लूएसचे 73, ओबीसीचे 203, एससीचे 105, एसटीचे 60 अशा उमेदवारांचा समावेश आहे. एकाचा निकाल आयोगानं राखून ठेवलेला आहे. महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. तिची ऑल इंडिया रँक 13 वी आहे. टॉप 15 मध्ये दिसणारं हे एवढं एकच नाव आहे. पहिल्या 15 मध्ये कोण कोण आहे, त्यांची नावं खालीलप्रमाणे

टॉप 15 ऑल इंडिया रँक

  1. 6- यक्ष चौधरी
  2. 7- सम्यक जैन
  3. 8- इशिता राठी
  4. 9- प्रीतमकुमार
  5. 10- हरकिरतसिंग रंधवा
  6. 11- शुभांकर प्रत्यूष पाठक
  7. 12- यशरथ शेखर
  8. 13- प्रियंवदा अशोक म्हाडदळकर
  9. 14- अभिनव जैन
  10. 15- सी यशवंतकुमार रेड्डी

यूपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल 2021 कसा तपासायचा

  • उमेदवारांनी प्रथम यूपीएससी अधिकृत वेबसाईटला upsc.gov.in भेट द्यावी.
  • वेबसाईटच्या होम पेजवर उपलब्ध यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस फायनल रिझल्ट फायनल रिझल्ट 2021 लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पीडीएफ उघडेल
  • उमेदवार पीडीएफमध्ये नाव, रोल नंबर तपासू शकतात
  • निकालाची पीडीएफ फाईल डाउनलोड करा आणि पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा यूपीएससी 2021 चा अंतिम निकाल तपासण्यासाठी, सर्व उमेदवारांनी खाली नमूद दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. लॉग इन करा — upsc.gov.in

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?