जगातील टॉप एमबीए स्कूलमध्ये कोणाचा नंबर वन, आपल्या एमबीए स्कूलचा क्रमांक कितवा ? फायनान्सिएल टाईम्सने केली यादी जाहीर

जगातील टॉप - २० एमबीए स्कूलमध्ये अमेरीकेचे कोलंबिया बिझनेस स्कूल जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर फ्रान्सचे इनसिड आणि स्पेनचे लेसे इन्सिट्यूट तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्या देशाची काय परिस्थिती आहे ?

जगातील टॉप एमबीए स्कूलमध्ये कोणाचा नंबर वन, आपल्या एमबीए स्कूलचा क्रमांक कितवा ? फायनान्सिएल टाईम्सने केली यादी जाहीर
ISBImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 8:22 AM

नवी दिल्ली : हल्ली एमबीए शिक्षण घेण्यासाठी तरूणांमध्ये चांगलीच चढाओढ असते. अशात फायनान्सिएल टाईम्सने जगातील शंभर उत्तम शिक्षण सुविधा असलेल्या एमबीए इन्स्टिट्यूटची यादी जाहीर केली आहे. या यादीत आपल्या देशातील बिझनेस स्कूलचा क्रमांक कितवा असेल अशी उत्सुकता तुम्हाला लागली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जगातील टॉप – १००  एमबीए स्कूलची यादी फायनान्सियल टाईम्सने जाहीर केली असली तरी त्यात आपल्या देशातील केवळ हैदराबादच्या या संस्थेने बाजी मारली आहे.

हैदराबाद आणि मोहाली येथील इंडीयन स्कूल ऑफ बिझनेस ( isb) आणि अहमदाबाद, बंगलोर, कोलकाता, इंदूर आणि लखनऊच्या इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटनी यंदाच्या ग्लोबल एमबीए २०२३ च्या यादी स्थान मिळविले आहे. यंदा आपल्या देशातील प्रथम क्रमांकाच्या आयएसबी अर्थात हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या इंडीयन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेचा क्रमांक ३२ वरून ३९ वर घसरला आहे.

आयआयएम इंदूर आणि लखनऊ यांनी त्यांचे स्थान कायम राखले आहे. आयआयएम अहमदाबादने त्यांचा क्रम सुधारला आहे. तर इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस (आयएसबी ) हीच देशातील नंबर वन बिझनेस स्कूल ठरला असल्याचे फायनान्सिअल टाईम्सने म्हटले आहे.

आयएसबीचा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम देशात क्रमांक एकवर कायम असल्याचे फायनान्सिअल टाईम्सच्या ग्लोबल एमबीए रॅंकींग २०२३ मध्ये म्हटले आहे. गेली अनेक वर्षे आपला क्रमांक एक कायम ठेवत आयएसबी ही भारतातील एकमेव संस्था जगातील टॉप – ५० बिझनेस स्कूलमध्ये आली आहे. ही संस्था आशियामध्ये सहाव्या क्रमांकावर असल्याचे हैदराबादस्थित आयएसबीच्या मुख्यालयातून जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

एफटी ग्लोबल एमबीए रँकिंगमध्ये आमच्या आयएसबी स्कूलने देशातील सर्वोच्च स्थान सातत्याने कायम राखले आहे याचा आम्हाला अभिमान असल्याचे आयएसबीचे डेप्युटी डीन प्रो. रामभद्रन यांनी म्हटले आहे. आपल्या विद्यार्थ्यांना संशोधनात्मक अभ्यासक्रम आणि अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था देत असल्याने ते त्यांच्या क्षेत्रात लीडर म्हणून पुढे येत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

जगातील टॉप – २० एमबीए स्कूलमध्ये अमेरीकेचे कोलंबिया बिझनेस स्कूल जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर फ्रान्सचे इनसिड आणि स्पेनचे लेसे इन्सिट्यूट तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.

जगातील टॉप – २० एमबीए संस्थांची यादी पाहा – 

College
Country
Columbia Business School
US
Insead
France/Singapore
Iese Business School
Spain
Harvard Business School
US
Stanford Graduate School of Business
US
SDA Bocconi School of Management
Italy
University of California at Berkeley: Haas
US
Cornell University: Johnson
US
Northwestern University, Kellogg School of Management
US
Yale School of Management
US
Duke University’s Fuqua School of Business
US
MIT: Sloan
US
University of Chicago: Booth
US
UCLA Anderson School of Management
US
Dartmouth College: Tuck
US
London Business School
UK
HEC Paris
France
University of Virginia: Darden
US
New York University: Stern
US
Ceibs
China
Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.