Nashik Lok Sabha Results : नाशिक लोकसभा निकाल 2019

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि दिंडोरी असे दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आणि राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने दोन्ही मतदारसंघाचे महत्त्व विशेष आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेल्या नाशिककडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नाशिक लोकसभा निकाल – Nashik Lok Sabha Results : नाशिक लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे […]

Nashik Lok Sabha Results : नाशिक लोकसभा निकाल 2019
Follow us on

नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि दिंडोरी असे दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आणि राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने दोन्ही मतदारसंघाचे महत्त्व विशेष आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेल्या नाशिककडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नाशिक लोकसभा निकाल – Nashik Lok Sabha Results : नाशिक लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 58 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये 58.84 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 0.84 टक्क्यांनी घटला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं. या मतदारसंघात एकूण 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र भाजप महायुतीकडून हेमंत गोडसे तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून समीर भुजबळ यांच्यातच प्रमुख लढत झाली. नाशिकमध्य अगोदर चित्र वेगळं दिसत होतं. कारण अगोदर दोन उमेदवार रिंगणात दिसत होते. मात्र त्यानंतर वंचित आघाडीचे पवन पवार आणि अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी निवडणुकीत उडी घेतल्याने चौरंगी लढत झाली आणि शेवटच्या टप्प्यात मात्र निवडणूक रंगत भरली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाहेमंत गोडसे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसमीर भुजबळ (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरपवन पवार (VBA)पराभूत

दिंडोरी लोकसभा निकाल – Dindori Lok Sabha Results : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झाले. इथे यंदा 64 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या 2014 मध्ये या मतदारसंघात 63. 40 टक्के इतके मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 0.60 इतकी मतदानाची वाढ झाल्याचे दिसून आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते .मात्र भाजप-सेना महायुतीकडून डॉक्टर भारती पवार, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून धनराज महाले तर माकपकडून जे पी गावित या प्रमुख उमेदवारात लढत झाल्याने या मतदार संघात तिरंगी लढत बघायला मिळाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाडॉ. भारती पवार (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीधनराज महाले (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरबापू केळू बर्डे (VBA)पराभूत