वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, कन्हैय्याकुमार, हार्दिक पटेल काँग्रेसचे स्टारप्रचारक; काँग्रेसची यादी जाहीर

वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, कन्हैय्याकुमार, हार्दिक पटेल काँग्रेसचे स्टारप्रचारक; काँग्रेसची यादी जाहीर
star pracharak

निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेस कोणत्याही कारणाने मागे राहू नये असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. त्यासाठी आता कॉंग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये 30 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 24, 2022 | 6:08 PM

दिल्लीः  उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Assembly 2022) विधानसभा (Assembly) निवडणुका जिंकण्यासाठी कॉंग्रेसकडून (Congress) सर्वशक्ती पणाला लावण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेस कोणत्याही कारणाने मागे राहू नये असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. त्यासाठी आता कॉंग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये 30 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यामध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan singh) यांचाही समावेश आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत सगळ्यात वरच्या स्थानी सोनिया गांधी यांचे नाव असून दुसऱ्या क्रमांकाला डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाला नाव आहे राहुल गांधी यांचे तर चौथ्या क्रमांकावर प्रियंका गांधी यांचे नाव आहे. प्रचारासाठी आता प्रियंका गांधी यांच्याबरोबरीने राहुल गांधीही उत्तर प्रदेशातील मतदारांसोबत संवाद साधणार आहेत.

कन्हैया कुमार, हार्दिक पटेल किमया साधणार

कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट असल्यामुळे उत्तर प्रदेशामधील कॉंग्रेसच्या राजकीय सभांना नक्कीच गर्दी होणार आहे. कारण वक्तव्यावर हुकमत असलेला तरुण नेता कन्हैया कुमार उत्तर प्रदेशच्या मतदारांवर काय प्रभाव पाडणार याकडे साऱ्यांच लक्ष लागले आहे.

प्रचारात तोफा धडाडणार

या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. तर युवकांमध्ये चर्चेत असलेले चेहरे कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल यांचीही नावे आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या सभा या वक्त्यांच्यामुळे धडाडणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

उत्तर प्रदेशच्या निवडणूकींच्या प्रचारासाठी कॉंग्रेसने तयार केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत माजी खासदार गुलाम नबी आझाद, सलमान खुर्शिद यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याही नावाचा समावेश आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राज बब्बर, अजयकुमार लल्लू आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा, महाराष्ट्रातील प्रणिती शिंदे हेही उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांचा प्रचार करणार आहेत.

 

संबंधित बातम्या

निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट, फडणवीसांनंतर चंद्रकांत पाटलांचाही पलटवार

चंद्रशेखर बावनकुळे कोरोना पॉझिटिव्ह! पटोलेंविरोधातील आंदोलनात 2 वेळा सहभागी, पोलिसांनीही घेतलं होतं ताब्यात!

दिल्लीतल्या नेत्यांकडून सेना संपवण्याचा प्रयत्न, नवाब मलिक म्हणतात बाळासाहेब असताना…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें