एक्झिट पोलची निकालातून एक्झिट! राज्यात धक्कादायक निकाल, कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?
काल महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल समोर आला होता. तसेच आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका कोणाकडे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जवळपास नऊ वर्षांनंतर महानगरपालिका निवडणुकसाठी 15 जानेवारी रोजी राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास 29 महानगरपालिकांसाठी मतदान करण्यात आले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल समोर आला होता. पण, आज 16 जानेवारीला सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एक वेगळेच चित्र समोर आले आहे. मतदरांनी एक्झिट पोल चुकीचा ठरवला आहे.
मुंबई महापालिकेचा एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिंदे यांच्या युतीला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. तर ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 62 जागा मिळतील असे म्हटले होते. पण समोर आलेल्या आकडेवारीने संपूर्ण चित्र बदलले आहे.
Municipal Election 2026
BMC Mahapalika Election Results : भाजपाचा होणार मुंबईत महापाैर, तब्बल इतके उमेदवार...
Maharashtra Election Results 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा झटका...
Mumbai Election Ward No 105, 217, 39,168 Result Live 2026 : वॉर्ड क्रमांक 105, 217, 39,168 चा निकाल काय?
Mumbai Election Results Live 2026 : मुंबईत कुठल्या पक्षाकडे किती जागांची आघाडी?
अजितदादाच्या राष्ट्रवादीचा मतमोजणीवर बहिष्कार; रुपाली पाटील ठोंबरे यांचा भाजवर गंभीर आरोप
सांगलीचा महानिकाल, भाजच्या हातीच महापालिका
मुंबईची एक्झिट पोलनुसार आकडेवारी
भाजप- 57
शिवसेना- 20
शिवसेना UBT : 58
काँग्रेस : 09
मनसे- 7
राष्ट्रवादी-01
इतर-05
समोर आलेली आकडेवारी पाहाता भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट एकत्रितपणे 100 जागांवर आघाडीवर आहेत. यामध्ये भाजप 80 जागांवर आघाडीवर आहे तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 20 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे मुंबईतील स्थानिक राजकारणात महायुतीची ताकद स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) 55 जागांवर आघाडीवर असून, महायुतीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. मनसे 9 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेसची 11 जागा आघाडीवर आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) 1 जागेवर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
सकाळपासूनची समोर आलेली आकडेवारी
भाजप- 88
शिवसेना- 21
शिवसेना UBT : 58
काँग्रेस : 11
मनसे- 09
राष्ट्रवादी-01
इतर-07
