Goa | महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी करण्याच्या हालचाली, काँग्रेस-शिवसेना एकत्र लढणार?

Goa | महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी करण्याच्या हालचाली, काँग्रेस-शिवसेना एकत्र लढणार?
गोव्यात राजकीय घडामोडींना वेग

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि काँग्रेस गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यात आज सायंकाळी बैठक झाली होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 03, 2022 | 9:52 PM

पणजी : गोव्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी गोव्यातील राजकारणाला वेग आला आहे. गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणेच महाविकास आघाडी करण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची गोव्यात आज महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. या चर्चेमुळे महाविकास आघाडीसारखा प्रयोग गोव्यातही होण्याची दाट शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

नेमकं काय झालं?

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील स्थानिक नेतृत्त्वासोबत आज महत्त्वपूर्ण चर्चा केली. गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या सोमवारी संध्याकाळच्या सुमारास बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं चर्चा झाली असल्याची बोललं जातंय.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि काँग्रेस गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यात आज सायंकाळी बैठक झाली होती. या बैठकीत एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.

आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल?

दरम्यान, बराचवेळ गोवा फॉरवर्ड पक्षाला युतीसाठी ताटकळत ठेवलेल्या काँग्रेसननं आता युतीसाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचं राजकीय घडामोडींवर दिसून येतंय. डिसेंबर महिन्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधींसोबतही चर्चा केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत गोव्यात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार का, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे.

शिवसेनेची गोव्यात फारशी ताकद नाही. त्यातही उत्तर गोव्यातील मोजक्याच मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य आहे. दक्षिण गोव्यात तर गोव्याच अस्तित्व नगण्य असल्यासारखंच आहे. अशावेळी जर महाविकास आघाडीसारखा प्रयोग झाला, तर शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या –

मुख्यमंत्री म्हणाले, ‘आदित्यने माझा ताण कमी केला’, तर भाजप नेते म्हणतात ‘तुमचा कमी झाला पण जनतेचा वाढला’!

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणेंनी कशी जिंकली?, दीपक केसरकरांनी सांगितलं गुपित!

समीर वानखेडेंची बदली झाली तरी लढाई थांबणार नाही: नवाब मलिक


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें