Goa Assembly Elections 2022 : उत्पल पर्रीकरांवरून राऊतांनी पुन्हा डिवचले, फडणवीस समजूत काढण्यात पटाईत आहेत पण…

| Updated on: Jan 20, 2022 | 4:10 PM

ज्याला राजकीय चारित्र्य म्हणतात ते जपण्याचा मनोहर पर्रीकर यांनी प्रयत्न केला. एक आदर्श निर्माण केला. त्यांचे आमचे राजकीय मतभेद होते, पण राजकीय चारित्र्य त्यांनी नेहमी जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मतदार संघाचे नेर्तृत्व कोणत्या चरित्र्याने करावा हा प्रश्न उत्पल पर्रीकर यांनी उपस्थित केलाय. हे लक्षात घ्या ते गंभीर आहे. असे चिमटे राऊतांनी फडणवीसांना काढले आहेत.

Goa Assembly Elections 2022 : उत्पल पर्रीकरांवरून राऊतांनी पुन्हा डिवचले, फडणवीस समजूत काढण्यात पटाईत आहेत पण...
संजय राऊत, खासदार शिवसेना
Image Credit source: tv9
Follow us on

येत्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर(Utpal Parikar) यांच्या उमेदवारीवरून सद्या जोरदार राजकारण तापलं आहे. भाजपने त्यांना पणजी सोडून दुसऱ्या दोन मतदारसंघातून लढण्याचे पर्याय दिल्याची माहिती समोर आली आहे तर, त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनीही फडणवीसांना पुन्हा चिमटे काढले आहेत. भाजपने त्यांच्या कार्यक्रर्त्याला काय पर्याय दिले ? ते त्याने स्वीकारावेत की नाही ? यावर मी काय बोलणार ! त्यांचा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात हुशार आहेत. आम्ही महाराष्ट्रत पाहिले आहे. त्यांचे काम…एखाद्याचे मन वळवण्यात ते पटाईत आहेत. पण उत्पल त्यांचे ऐकत नसतील तर त्याची कारणे काय आहेत? हे गोव्याच्या जनतेला माहीत आहे. पणजीचे नेतृत्व विधानसभेत कोणत्या प्रवृत्तीने करावे असा प्रश्न उत्पल यांनी उपस्थित केलाय. ज्याला राजकीय चारित्र्य म्हणतात ते जपण्याचा मनोहर पर्रीकर यांनी प्रयत्न केला. एक आदर्श निर्माण केला. त्यांचे आमचे राजकीय मतभेद होते, पण राजकीय चारित्र्य त्यांनी नेहमी जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मतदार संघाचे नेर्तृत्व कोणत्या चरित्र्याने करावा हा प्रश्न उत्पल पर्रीकर यांनी उपस्थित केलाय. हे लक्षात घ्या ते गंभीर आहे. असे चिमटे राऊतांनी फडणवीसांना काढले आहेत.

अपक्ष लढल्यास उल्पल यांना सर्वजण पाठिंबा देऊ

तसेच भाजप ठरवेल की त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी. शिवसेनेचे उमेदवार उद्धव ठाकरे ठरवतील. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे उमेदवार ठरवतील. तो त्या पक्षाचाच अधिकार असतो. पण पर्रीकरांची केस वेगळी आहे. गोव्याच्या विकासात मनोहर पर्रीकर यांचे योगदान मोठे आहे. उत्पल त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार नसेल आणि ते अपक्ष उभे राहणार असतील तर आम्ही त्यांना पाठींबा देऊ हे आधीच जाहीर केलं आहे. इतर पक्षांनाही ते सांगण्याचा प्रयत्न करू. पर्रीकर यांच्याबाबतीत गोव्यातील लोकांच्या भावना खूप हळव्या आहेत. असेही राऊत म्हणाले आहेत.

उत्पल पर्रीकर यांनी भूमिकेवर ठाम राहवं

उत्पल पर्रीकर यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे. गोव्यातील जनता पाहते आहे की पर्रीकरांचा वारस किती हिमतीने पुढे जातो, असा सल्लाही उत्पल पर्रीकरांना राऊतांनी दिला आहे. भाजपला वाटले असेल गोव्यात घराणेशाहीला महत्व दिल्याने त्यांचे सरकार येईल. पण माझ्या मनात एकच प्रश्न आहे की मनोहर पर्रीकर यांच्या चिरंजीवांचे कर्तृत्व काय ? मेरिट काय ? असा प्रश्न विचारण्यात आला तर मग विश्वजीत राणे यांच्या पत्नीला तिकीट दिले तेव्हा हा प्रश्न लोकांनी विचारला की त्यांचे कर्तृत्व काय ? निवडून येण्याची क्षमता हे उत्तर असेल तर पर्रीकर यांच्या चिरंजीवात निवडून येण्याची क्षमता नाही ? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

Goa Assembly Election 2022 : भाजपने पत्ता कापल्यानंतर उत्पल यांना केजरीवालांची खुली ऑफर!

KDCC Bank Chairman Election : ठरलं..! कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ, उपाध्यक्षपदी राजीव आवळे यांना संधी

UP Elections: योगी आदित्यनाथ विरोधात भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद लढणार, गोरखपूर मतदारसंघात सामना!