Goa Assembly Election 2022 : भाजपने पत्ता कापल्यानंतर उत्पल यांना केजरीवालांची खुली ऑफर!

मनोहर पर्रिकर यांचे 2019 मध्ये निधन झाले. त्यानंतर गोव्याचे राजकारण बदलले आहे. विशेष म्हणजे भाजपने पणजी येथून वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिले आहे. त्यांच्यावर 2016 मध्ये एका तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

Goa Assembly Election 2022 : भाजपने पत्ता कापल्यानंतर उत्पल यांना केजरीवालांची खुली ऑफर!
उत्पल पर्रीकर
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 3:25 PM

नवी दिल्लीः भाजपने आज जाहीर केलेल्या गोवा विधानसभा निवडणूक उमेदवारांच्या यादीत उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापला आहे. त्यानंतर आम आदमी पक्षाचे (AAP)राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना गोवा निवडणूक (Goa Election) लढवण्यासाठी आपमध्ये येण्याची खुली ऑफर चक्क ट्वीट करून दिली आहे.

काय आहे ऑफर?

केजरीवाल यांनी एका खासगी चॅनलच्या वीडिओला ट्वीट करत ही ऑफर दिलीय. या वीडिओमध्ये असे म्हटले आहे की, उत्पल यांचा पक्ष त्यांना त्यांच्या वडिलांचा मतदारसंघ असलेल्या पणजीतून निवडणूक लढवायला परवानगी देत नाही. यावर केजरीवाल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भाजपचे पर्रिकर परिवाराबाबत ‘यूज एंड थ्रो’ धोरण आहे. मी नेहमी मनोहर पर्रिकर यांचा सन्मान केला. त्यामुळे AAP च्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी उत्पल यांचे स्वागत आहे.’ मनोहर पर्रिकर यांचे 2019 मध्ये निधन झाले. त्यानंतर गोव्याचे राजकारण बदलले आहे. विशेष म्हणजे भाजपने पणजी येथून वादग्रस्त आमदार बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिले आहे. त्यांच्यावर 2016 मध्ये एका तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

भाजपचे म्हणणे काय?

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत पणजीतून बाबूश मोन्सेरात निवडणूक लढणार असल्याचे उघड स्पष्ट झाल्यानंतर फडणवीसांना उत्पल यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी खुलासा केला. पणजीतून विद्यमान आमदारालाच तिकीट देण्यात आले आहे. उत्पल हे आमच्या परिवारातील आहेत. त्यांना दोन जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा त्यांनी नाकारली. दुसऱ्या जागेबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे सांगतानाच पर्रिकरांच्या कुटुंबाला भाजपने नेहमीच सन्मान दिला आहे, असे फडणवीस म्हणाले.

उत्पल काय म्हणतात?

भाजपने 40 पैकी 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा पत्ता कापण्यात आला आहे. मात्र, आपण पणजी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे सांगतानाच अन्य पर्यायांना अर्थच नाही, असे उत्पल पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. भाजपने गोव्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. अवघ्या तीन ओळीतच आपली भूमिका मांडत मी पणजीवरच ठाम आहे. अन्य पर्यायांना काही अर्थच नाही. माझी भूमिका लवकरच माध्यमांसमोर मांडेल, असे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर हे गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नाकीनऊ आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर बातम्याः

VIDEO: गोव्याबाबत शिवसेनेची काय आहे रणनिती? जागांबाबतची स्टॅटेजी काय?; राऊतांनी सांगितला प्लान

आम्ही ‘सोंगाड्या’ नक्कीच नाही, चंद्रकांत पाटील म्हणजे ‘टॉलस्टॉय’ नाहीत, संजय राऊतांना फडणवीस, चंद्रकांतदादांवर निशाणा

VIDEO: उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही, हे तर बोलघेवडे; राऊतांचा चंद्रकांतदादांवर हल्लाबोल

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.