AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही, हे तर बोलघेवडे; राऊतांचा चंद्रकांतदादांवर हल्लाबोल

गोव्यातील भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर यांच्या तिकीटावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.

VIDEO: उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही, हे तर बोलघेवडे; राऊतांचा चंद्रकांतदादांवर हल्लाबोल
तर सोमय्यांनी वायनरी ताब्यात घेऊन चालवावी, सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे विकतो का?: राऊत
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 10:45 AM
Share

मुंबई: गोव्यातील भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर यांच्या तिकीटावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. राऊत यांनी पाटील यांच्या या उत्तरांना प्रतित्युत्तर दिलं आहे. उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही. हे फक्त बोलघेवडे आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. भाजपने उत्पल पर्रिकरांना तिकीट दिल्यानंतर शिवसेनेसह सर्व पक्ष तिथे उमेदवार देणार नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला. याबाबत ते कोण सांगणार? जे बोलत आहेत, त्यांच्या हातात काहीही नाही. उत्पलला तिकीट द्यायचं असतं तर तेव्हाच दिलं असतं. हे बोलघेवडे आहेत. तिकीट का थांबवलं हा मोठा प्रश्न . उत्पल पर्रिकर अपक्ष राहत असतील तर त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये एवढंच आमचं म्हणणं होतं. एखाद्या नेत्याबाबत सहानभूती असते. एखाद्या नेत्याच्या कुटुंबातून कोणी उभे राहत असतील तर आपण उमेदवार देत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तिच गोव्याची आहे, असं राऊत म्हणाले.

माफियाला तिकीट का दिलं त्यावर बोला

उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा देऊ असं आम्ही म्हटलं तेव्हा त्यांची पळापळ सुरू झाली. आता त्यांना तिकीट द्यावच लागेल. गोव्यात भाजप दिसत आहे ती केवळ मनोरह पर्रिकरांमुळे. आजही भाजपला मनोहर पर्रिकरांच्या नावाने ओळखले जाते. अन् त्यांच्याच मुलाची लायकी काढता? ज्या मतदारसंघाचं पर्रिकरांनी प्रतिनिधीत्व केलं, त्या मतदारसंघातून माफियाला तिकीट देता त्यावर भाजपने बोललं पाहिजे, असं आव्हानच त्यांनी दिलं.

उद्या पटेलांशी चर्चा

उद्या मी गोव्यात जात आहे. आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करू. आम्ही चर्चा करू. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हे आज गोव्यात जात आहेत. त्यांच्याशी चर्चा करून कोण कुठे लढणार हे ठरवू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गोव्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही

गोवा छोटं राज्य आहे. गोव्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही. गोव्यात वेगळ्या प्रकारची खिचडी निर्माण होत आहे, असा दावाही त्यांनी केला.

ममता बॅनर्जींनी जरूर रॅली करावी

भाजपचं उत्तर प्रदेशात ढोंग सुरू आहे. त्यांच्या राजकारणाला दुर्गंध येत आहे. ममता बॅनर्जींच्या व्हर्च्युअल उत्तर प्रदेशात रॅलीने महौल बदलत असेल आणि अखिलेश यादवांना फायदा होत असेल तर त्यांनी जरूर रॅली करावी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या:

Nashik | आजपासून कडक हेल्मेटसक्ती; पहिल्यांदा पाचशेचा दंड, दुसऱ्यांदा खोड मोडणारी कारवाई होणार

एक लाख रुपयांचा दंड भरून राज क्लॉथ सुरु, नियम मोडले तर दंड भरू, पण सील करू नका! औरंगाबादेत व्यापाऱ्यांची मागणी

Maharashtra News Live Update : उत्पल पर्रिकर यांना तिकीट देण्यास उशीर का होतोय? : संजय राऊत

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.