
भाजपने दोन वेळा खासदार राहिलेल्या हेमा मालिनी यांना मथुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली.त्यांच्याविरोधात काँग्रेस-सपा आघाडीने मुकेश धनगर यांना उमेदवारी दिली आहे. सध्या मतमोजणी सुरु असून हेमा मालिनी आघाडीवर आहेत. त्यामुळे पुन्हा हेमा मालिनी संसदेत दिसणार… अशी शक्यता निर्माण होत आहे. तर दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होईल. नुकताच एएनआयसोबत संवाद साधताना भाजपची सत्ता स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. सझ्या सर्वत्र हेमा मालिनी यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मतमोजणी सुरु आहे त्यामुळे थोडं दडपण आहे. कोण येणार त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मला पूर्व विश्वास आहे की आमच्या पक्षाचा विजय होईल आणि आम्ही सरकार देखील स्थापन करु. मथुरातून मला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.’
पुढे अभिनेत्री म्हणाल्या, ‘दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल समोर येतील. यावेळी देखील मोदी सरकार असणार. देशासाठी, येणाऱ्या पिढीसाठी मोदी सरकार फार महत्त्वपूर्ण असणार आहे. माझं देखील याठिकाणी असणं फार महत्त्वाचं आहे. मला खूप काही करायचं आहे. योजनांचा विचार केलेला आहे. यावेळी मी माझं पूर्ण करणार आहे…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.
सांगायचं झालं तर 2014 पासून हेमा मालिनी मथुरा येथे खासदार म्हणून काम पाहात आहेत. मथुरा लोकसभा मतदारसंघातून हेमा मालिनी भारतीय जनता पक्षाकडून रिंगणात होत्या. तर त्यांच्या विरोधात इतर 12 उमेदवार देखील होते. काँग्रेसने महेश पाठक, राष्ट्रीय लोकदलाने कुंवर नरेंद्र सिंह, स्वतंत्र जनता पक्षाने ओम प्रकाश यांना उमेदवारी दिली होती.
2014 मध्ये हेमा मालिनी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडूण आल्या होत्या. आता देखील हेमा मालिनी आघाडीवर आहे. त्यामुळे मथुरा याठिकाणी पुन्हा हेमा मालिनी यांचा विजय होणार की नाही? पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.