AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्यात शरद पवारांची मोठी खेळी, काँग्रेसच्या या नेत्याला देऊ शकतात संधी

सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून मोठी खेळी होऊ शकते. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणामुळे माघार घेतल्याने साताऱ्यात शरद पवार काँग्रेसचा उमेदवार देऊ शकतात. माजी मुख्यमंत्र्यांना येथून शरद पवार संधी देऊ शकतात.

साताऱ्यात शरद पवारांची मोठी खेळी, काँग्रेसच्या या नेत्याला देऊ शकतात संधी
sharad pawar
| Updated on: Mar 29, 2024 | 9:47 PM
Share

Satara Loksabha election : साताऱ्यातून शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येतीच्या कारणामुळं ते निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय श्रीनिवास पाटलांनी घेतला आहे. त्यामुळं आता 2 दिवसांत पुढचा उमेदवार कोण याचा निर्णय घेणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. साताऱ्यातल्या पवारांच्या बैठकीत 4-5 नावं समोर आली आहेत. ज्याचा उल्लेख पवारांनीही केला. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांची नावं चर्चेत आहेत. मात्र असं असलं तरी अचानक काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचंही नाव पुढं आलं आहे. भिवंडीची काँग्रेसची जागा घेऊन काँग्रेससाठी शरद पवार साताऱ्याची जागा सोडू शकतात.

महायुतीत साताऱ्याच्या जागेवर उदयनराजेच लढतील अशी शक्यता आहे. 2 दिवसांआधीच दिल्लीतल्या बैठकांनंतर साताऱ्यात राजेंनी शक्तिप्रदर्शनही केलं. अर्थात उदयनराजे भाजपच्या कमळवर लढणार की किंवा अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लढणार याचा सस्पेंस आहे. त्यामुळं उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी तितक्याच ताकदीचे उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाणांचं नाव समोर येतंय.

2019च्या लोकसभेत राष्ट्रवादीकडून उदयनराजेच जिंकले होते. मात्र त्यानंतर उदयनराजेंनी राजीनामा दिला आणि भाजपात गेले. मात्र पोटनिवडणुकीत पराभूत झाले. राजेंना, श्रीनिवास पाटलांनीच मात दिली होती.

श्रीनिवास पाटलांना 6 लाख 36 हजार 620 मतं घेतली. तर उदयनराजेंना 5 लाख 48 हजार 903 मतं मिळाली. 87 हजार मतांनी उदयनराजेंचा श्रीनिवास पाटलांनी पराभव केला. शरद पवारांना पत्रकारांनी उदयनराजेंवरुनही प्रश्न केला. उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क साधला का आणि यापुढे जर संपर्क केला तर संधी देणार का ?. पवारांनी स्पष्ट नकार देत, कॉलर उडवून हशाही पिकवला.

पवारांनीही उडवली कॉलर !

साताऱ्यात महायुतीला रोखण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे. 2019च्या पोटनिवडणुकीत पावसात भिजून त्यांनी, बाजी पलटवली होती. आता नवी खेळी करुन थेट पृथ्वीराज बाबांनाच मैदानात उतरवलं जातं का ?, हे पाहणं महत्वाचं असेल.

उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्लीत त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.