
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला धक्का बसत असताना भाजपसाठी चांगली बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदार संघातून विजयी झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा त्यांनी 152513 मतांनी पराभव केला. वाराणसीमधून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा खासदार बनले आहे.
देशातील सर्वात हॉट सीटवरील लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिछाडीवर आहेत. ६ हजार ५०० मतांनी नरेंद्र मोदी पिछाडीवर होते. त्यानंतर काही काळात त्यांनी काँग्रेस उमेदवार अजय राय यांना पिछाडीवर टाकले. लोकसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (bjp candidate narendra modi) यांच्या वाराणसी मतदार संघात काय होणार? याकडे राजकीय विश्लेषकांची नजर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणावरुन तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय (congress candidate ajay rai) आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी सामना झाला.
स्वतंत्र्यानंतर रघुनाथ सिंह तीन वेळा या ठिकाणावरुन खासदार झाले. 1967 मध्ये सीपीएमचे एस. एन.सिंह यांनी त्यांना पराभूत केले. 1971 मध्ये काँग्रेसने विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु प्रो. राजाराम शास्त्री यांनी निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांनी जनसंघचे कमला प्रसाद सिंह यांना पराभूत केले. 1977 मध्ये जेपी लहरमध्ये लोकदलचे चंद्रशेखर खासदार झाले. 1980 मध्ये काँग्रेसचे पंडीत कमलापती त्रिपाठी यांनी राजनारायण यांना पराभूत केले. 1984 मध्ये काँग्रेसचे श्यामलाल यादव, 1989 मध्ये व्ही.पी. सिंह लहरमध्ये जनता दलाचे अनिल शास्त्री विजयी झाले.
1991 प्रथम राम मंदिराचे नायक श्रीशचंद दीक्षित यांनी या मतदार संघात प्रथम भगवा फडकवला. त्यानंतर तीन वेळा भाजपचे शंकर प्रसाद जायसवाल खासदार राहिले. 2004 मध्ये डॉ. राजेश मिश्रा यांनी त्यांना पराभूत केली. 2009 मध्ये भाजपने डॉ. मुरली मनोहर जोशी यांना उतरवले. ते विजयी झाले. त्यानंतर 2014 व 2019 मध्ये नरेंद्र मोदी विजयी झाले.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स