AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम तरुणाच्या कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ… तरुणीच्या नावाने हॉटेल बूक आणि…, धक्कादायक सत्य कसं आलं समोर

उज्जैन महाकाल मंदिराभोवती तरुणीच्या नावाने मुस्लीम तरुणाची हॉटेल रुममध्ये एन्ट्री... मुस्लीम पण त्याच्या कपाळावर टिळा... गळ्यात तुळशीचा माळ... धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर कसं पकडलं सत्य...

मुस्लीम तरुणाच्या कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ... तरुणीच्या नावाने हॉटेल बूक आणि...,  धक्कादायक सत्य  कसं आलं समोर
| Updated on: Feb 18, 2026 | 2:21 PM
Share

उज्जैन महाकाल मंदिराभोवती असं काही घडलं जे जाणून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. येथे बजरंग दलाने दुसऱ्या समाच्या समाज्या तरुणाला पकडलं, जो हिंदूप्रमाणे कपाळावर टीळा आणि गळ्यात तुळशीची माळ आणि भगवे वस्त्र घालून फिरत होता… सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिर तसेच मंगलनाथ मंदिरात फिरत होता. पण, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं आणि त्याच्याकडून सत्य जाणून घेतलं… बजरंग दलाचे जिल्हा समन्वयक ऋषभ कुशवाह म्हणाले, मला माहिती मिळाली होती की एका तरुणाला हॉटेलमध्ये राहायचे आहे. पण तो स्वतःच्या आयडीने नाही तर, एका मुलीच्या नावाने हॉटेलमध्ये रुम बूक करत आहे…

मुलीच्या नावाने हॉटेल बूक करत आहे कळताच बजरंग दलाच्या कार्यकर्ते नानखेडा याठिकाणी पोहोचले… त्या ठिकाणी तो तरुण तर भेटला पण त्याने घातलेले कपडे पाहिल्यानंतर मोठा धक्का बसला. कारण तो तरुण मुस्लीम होता आणि त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी भगवे कपडे घातले होते, एवढंच नाही तर, गळ्यात तुलशीच्या माळा आणि कपाळावर टीळा देखील लावलेला होता.

तरुणाला जेव्हा त्याचं नाव विचारण्यात आलं, तेव्हा त्याने हिंदू नाव सांगितलं. पण त्याच्याजवळ असलेल्या डॉक्यूमेंटवर त्याचं नाव जाफर असं होतं… समोर आलेल्या माहितीनुसार, जाफर दिल्लीहून एका मुलीला उज्जैनला घेऊन आला होता. जाफर इतका हुशार होता की, त्याने स्वतःच्या ओळखपत्राऐवजी मुलीच्या कागदपत्रांचा वापर करून नानखेडा पोलिस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये खोली बुक केली.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, तो महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवस मुलीसोबत मंगलनाथ आणि महाकाल मंदिरात फिरत राहिला आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये पोहोचला.

कशी पटली ओळख…

स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्याने भगवे कपडे घातले होतं. अशात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला नाव विचारलं… तेव्हा त्याने हिंदू नाव सांगितलं. त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला जाफर म्हणून मोठ्याने हाक मारली… तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं… याच एका घटनेमुळे जाफर याला पडकडण्यात आलं… जेव्हा त्याची झडती घेण्यात आली तेव्हा कळलं की, तो हिंदू नाही तर मुस्लीम आहे.

सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी देखील करत आहेत. जाफरने हिंदू वेशात धार्मिक स्थळांना भेट देऊन एका मुलीसोबत लव्ह जिहाद करण्याचं वक्तव्य केलं त्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते संतापले. अनेकांनी त्याला मारहाण देखील केली. पण बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांकडे दिलं. आता पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...