मनसेबाबत भाजपचा काय आहे प्लान, पाहा कधी होणार मनसे-भाजप युतीची घोषणा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मनसे महायुतीत येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तसे झाले नाही. युतीची घोषणा अजूनही झाली नाही. त्यामुळे याबाबत टाईमिंग साधलं जाईल अशी शक्यता आदित्य ठाकरे यांनी वर्तवली आहे.

मनसेबाबत भाजपचा काय आहे प्लान, पाहा कधी होणार मनसे-भाजप युतीची घोषणा?
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 8:36 PM

Raj Thackeray : 9 मार्चला मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते की निवडणुकीत काय निर्णय घ्यायचेत हे लवकरच सांगणार. त्यानंतर राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. मुंबईत आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. मात्र महायुतीचं मनसेबद्दल काही ठरलेलं नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातली मतदानासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 27 मार्चला संपली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 4 एप्रिलला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. पहिल्या 2 टप्प्यातील विदर्भ आणि मराठ्यातील 13 मतदारसंघात अद्याप मनसेनं उमेदवार दिलेला नाही किंवा भूमिकाही स्पष्ट केलेली नाही. तर उत्तर प्रदेशातल्या 3 टप्प्यातील मतदान झाल्यावर मनसेला सोबत घेतील असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

यूपीतील मतदानानंंतर घेणार सोबत?

राज ठाकरे यांना भाजपनं सोबत घेतलं तर उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांचा परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केला जावू शकतो त्यामुळं यूपीतील दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यावर मनसेला सोबत घेतलं जाईल असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत आणि 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या 3 टप्प्यांचं मतदान 19 एप्रिल, 26 एप्रिल आणि 10 मे रोजी होणार आहे. पहिल्या 3 टप्प्यात 26 जागांवर मतदान होईल आणि या 3 टप्प्याच्या मतदानानंतरच, नाशिक, ठाणे आणि मुंबईच्या सर्व 6 जागांवर 20 मे रोजी मतदान आहे. मनसेची ताकदही याच ठिकाणी आहे. त्यामुळं यूपी आणि मुंबईचं टायमिंग साधूनच मनसेला भाजप सोबत घेईल असं आदित्य ठाकरे म्हणत आहेत.

गुढीपाडव्याला भूमिका स्पष्ट करणार?

महाराष्ट्र भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा हे राज ठाकरे यांची पुढच्या आठवड्यात भेट घेणार आहेत. म्हणजेच राज ठाकरे यांना सोबत घेण्याच्या हालचाली पुन्हा सुरु होतील. राज ठाकरे यांना सोबत घेण्यावरुन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच सांगू शकतील, असं मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनसेची भूमिका काय हे आता राज ठाकरेच सांगणार आहेत. मनसेच्या गुडीपाडव्याच्या मेळाव्यात ते भूमिका स्पष्ट करु शकतात. त्याचे संकेत त्यांनी गेल्या महिन्यातल्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून दिले होते.

याआधी 2009 आणि 2007 मध्ये मनसेनं लोकसभा निवडणूक लढवलीय. मात्र 2019 मध्ये त्यांनी निवडणूक न लढवता अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रचार केला होता. आता 2024 मध्ये मनसेचं इंजिन महायुतीच्या दिशेनं दिसतंय. पण अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला दिसत नाही.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.