
राज्यातील महानगरपालिकांचे निकाल हाती येत असून यामध्ये सर्वात जास्त जागा या भाजप पक्षाला मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपला सध्या 920 जागा मिळाल्या असून शिवसेना 237 तर काँग्रेस 172, शिवसेना UBT ला 124 जागा, अजित पवार-110, MIM- 41, वंचित-18, राष्ट्रवादी- शरद पवार- 18, मनसे- 11 आणि इतरमध्ये-144 उमेदवार विजयी झाले आहेत.
ना भाजप, ना शिवसेना, ना काँग्रेस, वसई-विरार पालिकेवर बविआची सत्ता. 65 उमेदवार आघाडीवर तर भाजपचे 45 उमेदवार आघाडीवर आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का. भाजपचे सर्वात जास्त उमेदवार आघाडीवर. पुण्यात भाजपचे 52 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 74 जागांवर भाजपचे उमेदवार. तर पुण्यात अजित पवार यांचे 5 तर पिंपरी -चिंचवडमध्ये 40 उमेदवार आघाडीवर.
लातूर महापालिका भाजपच्या हातून जाणार असल्याचे दिसून येत आहे. कारण लातूरमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त उमेदवार आघाडीवर आहेत.
अहिल्यानगर महापालिकेचे निकाल सध्या समोर आले आहेत. यामध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 20 उमेदवार आघाडीवर आहेत.
जल्लोषासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूरच्या दिशेने. थोड्याच वेळात भाजप कार्यलयाबाहेर जल्लोष. हा प्रणिती शिंदे यांच्यासाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल.
सोलापुरात भाजपने बहुमताचा आकडा गाठला . जल्लोषासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात भाजप कार्यलयाबाहेर जल्लोष होईल.
वॉर्ड क्रमांक 32 मधून ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गीता भंडारी विजयी.
वॉर्ड क्रमांक 124 ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सकीना शेख विजयी झाल्या आहेत.
पुणे महापालिकांचे निकाल हे खळबळजनक असून अजित पवारांना मोठा धक्का मिळत असल्याचे दिसत आहे. पुण्यात भाजपचे 49 उमेदवार आघाडीवर आहे.
राज्यातील निवडणुकांच्या निकालामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. यामध्ये शिवसेना UBT आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 83 उमेदवार तर अजित पवार यांच्या पक्षाचे 83 उमेदवार आघाडीवर आहेत.
राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत असून यामध्ये काँग्रेसने देखील बाजी मारली आहे. राज्यात काँग्रेसचे 147 उमेदवार आघाडीवर आहेत.
ठाणे महापालिकेचे निकाल सध्या समोर आले असून यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 20 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.
जळगावच्या प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या उमेदवार जयश्री महाजन, सुनील महाजन, राब याबी खान आणि रितिक ढेकळे या चारही जणांचा विजय झाला आहे. शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी महापौर जयश्री महाजन, पती सुनील महाजन या दोघांचा विजय झाला आहे.
राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती येत असून मुंबईमध्ये शिवसेनेचे 34 उमेदवार आघाडीवर आहेत.
ठाणे महानगरपालिकांचे निकाल समोर आले आहे. यामध्ये भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे.
मुंबई महापालिकांचे निकाल हाती येत असून आतापर्यंत हात आलेल्या निकालांमध्ये भाजप आघाडीवर असून भाजपचे 45 उमेदवार आघाडीवर आहेत.
BJP Maharashtra Election Results 2026 : राज्यातील महापालिकांचे निकाल हाती येत असून भाजप हा सर्वात जास्त आघाडीवर असून आतापर्यंत भाजपचे 496 जागांवर आघाडी आहे.
Shivsena Maharashtra Election Results 2026 : राज्यातील महापालिकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून सध्या राज्यात शिवसेना पक्ष हा 139 जागांवर आघाडीवर आहे.
BJP Maharashtra Election Results 2026 : सर्वात मोठी बातमी, राज्यातील अनेक महानगरपालिकांचे निकाल सध्या समोर येत आहेत. यामध्ये राज्यात सर्वात जास्त जागांवर आघाडीवर असाणारा पक्ष भाजप आहे. भाजप सध्या 393 जागांवर आघाडीवर.
जळगावच्या प्रभाग क्रमांक 1 ते 3 इथल्या मतमोजणीच्या ठिकाणी ईव्हीएम मशीनचे सील फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनचे सील आधीच फुटलेले असल्यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून मतमोजणीच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांच्यासह सहकर्मचाऱ्यांकडून पाहणी सुरू आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक तसंच आयुक्त या प्रकाराची माहिती घेत आहेत.
कोल्हापूरमधून प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपाचे 4 उमदेवार विजयी झाले आहेत. भाजपाने मोठी बाजी कोल्हापूरमध्ये मारल्याचे येणाऱ्या निकालावरून दिसत आहे.
राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज राज्यातील महानगरपालिकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून यामध्ये सर्वात आघाडीवर भाजप पक्ष आहे. सध्या अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर असून मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, बीड, नांदेड, सांगली, सातारा या महापालिकांच्या निवडणुकीकांचे निकाल समोर येत आहे. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांसाठी ही निवडणकू प्रतिष्ठेची ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील जनतेच्या नजरा या मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकांच्या निकालावर आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. साधारणपणे सायंकाळपर्यंत राज्यातील 29 महापालिकांचे निकाल स्पष्ट होतील. प्रशासनाकडून या निवडणुकीचे जय्यत तयारी करण्यात आली. या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालाचे सर्व अपडेट तुम्ही tv9 मराठीच्या लाईव्ह ब्लॉगवर पाहू शकता.