निवडणूक लढणाऱ्या या उमेदवारांच्या दोन-दोन बायका, मग मुले…

राजस्थान विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. निवडणूक शपथपत्रातून अनेक नेत्यांची रंजक माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या 7 नेत्यांच्या 2-2 बायका आहेत. तसेच तीन उमेदवार असे आहे की त्यांना पाच पेक्षा जास्त मुले आहेत. ही माहिती त्या नेत्यांनीच निवडणुकीच्या शपथपत्रात दिली आहे.

निवडणूक लढणाऱ्या या उमेदवारांच्या दोन-दोन बायका, मग मुले...
अर्जुनलाला मीणा यांनाही दोन बायका आहेत
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 5:07 PM

जयपूर | 16 नोव्हेंबर 2023 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजली जाणारी पाच राज्याची विधानसभा निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस पक्षांने उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थान विधानसभेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. त्यात संपत्तीची आणि परिवाराची माहिती निवडणुकीच्या शपथपत्रात दिली आहे. राजस्थानमधील मेवाड-वागड भागात २८ विधानसभा मतदार संघ आहे. त्यातील सात उमेदवारांना दोन-दोन बायका आहेत. त्यात भाजप आणि काँग्रेसचे दोन-दोन उमेदवार आहे. तसेच पाच पेक्षा जास्त मुले असणारे उमेदवारही आहेत. या उमेदवारांच्या लग्नाची चर्चा निवडणुकीत होत आहे.

कोण आहेत उमेदवार

झाडोलमधील काँग्रेसचे उमेदवार हिरालाल दरांगी यांना सात मुले आहेत. भाजपचे बाबूलाल खराडी यांना पाच मुले आहेत. खेरवाडा येथील भाजपचे उमेदवार नानालाल अहारी यांना सहा मुले आहेत. उदयपूरमधील वल्लभनगर मतदार संघातून निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार उदयलाल डांगा यांना दोन बायका आहेत. खेरवाडा येथील काँग्रेस उमेदवार परमार आणि झाडोला येथील काँग्रेस उमेदवार हिरालाला दरांगी यांनाही दोन, दोन बायका आहेत. प्रतापगडमधील भाजप उमेदवार हेमंत मीणा आणि काँग्रेस उमेदवार रामलाल मीणा यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात दोन बायका असल्याचा उल्लेख केला आहे. बांसवाडा जिल्ह्यातील गढी मतदार संघाचे उमेदवार कैलासचंद मीणा आणि घाटोल येथील काँग्रेस उमेदवार नानालाल निनामा यांनाही दोन बायका आहे.

हे सुद्धा वाचा

आदिवासी भाग, दोन-तीन बायका सामान्य बाब

मेवाड-वागड हा परिसर आदिवासी आहे. या भागात आदिवासी समूह मोठ्या प्रमाणावर आहे. या अदिवासी समुहात दोन-तीन लग्न ही सामान्य बाब आहे. अनेक जणांना दोन किंवा तीन बायका आहेत. उदयपूर खासदार अर्जुनलाला मीणा यांनाही दोन बायका आहेत. नुकतीच करवा चतुर्थी झाली. या वेळी त्यांच्या दोन्ही बायकांनी एकाच वेळी खासदार अर्जुनलाल मीणा याचा चेहरा पाहून उपवास सोडला होता. हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. मीणा यांच्या पत्नीचे नाव मीनाक्षी आणि राजकुमारी आहे. दोन्ही बायका बहिणी आहेत. राजकुमारी शिक्षिका आहेत तर मीनाक्षी यांच्या नावावर गॅस एजन्सी आहे.

मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.