ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे पाहा किती उमेदवार आघाडीवर

Telangana Election result : तेलंगणात सत्ताबदल होतांना दिसत आहे. तेलंगणात काँग्रेस सत्तेवर येताना दिसत आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या बीआरएस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे एमआयएमने ९ जागांवर उमेदवार दिले होते. त्याचा निकाल काय आहे जाणून घ्या.

ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे पाहा किती उमेदवार आघाडीवर
telangana election
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 2:02 PM

Telangana Election Result : तेलंगणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. तेलंगणावर सत्ता गाजवणारी केसीआरची यांच्या बीआरएस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आत्तापर्यंतचा निकाल पाहिला तर तर तेलंगणात काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. दुसरीकडे संपूर्ण ताकद पणाला लावणाऱ्या भाजपला आठ जागांवर आघाडी मिळाली आहे. पण या तीन मोठ्या पक्षांशिवाय तेलंगणात आणखी एक घटक आहे. तो म्हणजे – ओवेसी फॅक्टर.

एमआयएमचे ९ ठिकाणी उमेदवार

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनने (एआयएमआयएम) पक्षाने नऊ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. एमआयएम ज्या नऊ जागांवर निवडणूक लढवत आहे त्यापैकी सात हैदराबादमध्ये आहेत. ओवेसी हे हैदराबादचे खासदार आहेत.

एमआयएमने चारमिनार, बहादूरपुरा, मलकपेट, चंद्रयांगुट्टा, नामपल्ली, याकूतपुरा, कारवान, राजेंद्र नगर आणि ज्युबली हिल्स येथे उमेदवार उभे केले होते. या नऊपैकी चार जागांवर त्यांचा पक्ष आघाडीवर आहे.

एमआयएमचे कोणते उमेदवार आघाडीवर

अहमद बिन अब्दुल्ला बलाला मलकपेटमधून, मीर जुल्फिकार अली चारमिनारमधून, अकबरुद्दीन ओवेसी चंद्रयांगुट्टामधून आणि मोहम्मद मुबीन बहादूरपुरातून आघाडीवर आहेत. असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन सुमारे 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. 2018 मध्येही त्यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यांना 60 टक्के मते मिळाली.

तेलंगणात बीआरएसला मोठा झटका

ओवेसींचा पक्ष तेलंगणात किंगमेकर मानला जातो. निवडणुकीच्या निकालापूर्वीच असे बोलले जात होते की, केसीआर यांचा बीआरएस बहुमतात कमी पडला तर ओवेसींचा पक्ष त्यांना पाठिंबा देऊ शकतो. मात्र, ओवेसी काँग्रेससोबत जाण्याची शक्यता फारच कमी आहे.

तिसऱ्या आघाडीला झटका

2018 च्या विधानसभा निवडणुकीत  विजय मिळवल्यानंतर केसीआर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीबद्दल प्रयत्न सुरु केले होते. पण 2024 च्या निवडणुकीपूर्वीही ते याच फॉर्म्युल्याखाली विरोधी आघाडी इंडियामध्ये सामील झाले नाहीत. ऑक्टोबर 2022 मध्ये, KCR ने राष्ट्रीय मंचावर आणण्यासाठी त्यांच्या पक्षाचे नाव TRS (तेलंगणा राष्ट्र समिती) बदलून BRS (भारत राष्ट्र समिती) केले होते. पण आता राज्य ही गमवण्याची स्थिती त्यांच्यावर ओढवली आहे.

Non Stop LIVE Update
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र.
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन.
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत.
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.