UP Election 2022 : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांना मोठा धक्का! स्वामी प्रसाद मौर्य यांचा भाजपला रामराम, समाजवादी पार्टीत प्रवेश!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा झटका बसलाय. योगींच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. इतकंच नाही तर त्यांनी आजच अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्षात प्रवेशही केलाय. अखिलेश यादव यांनी स्वत: त्याबाबत माहिती दिली आहे.

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांना मोठा धक्का! स्वामी प्रसाद मौर्य यांचा भाजपला रामराम, समाजवादी पार्टीत प्रवेश!
स्वामी प्रसाद मौर्य यांचा समाजवादी पार्टीत प्रवेश
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 5:02 PM

लखनऊ : निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (5 State Assembly Election) घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ पाहायला मिळत आहे. गोवा आणि उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 7 टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता तिकीट वाटप आणि प्रचारबाबत रणनिती आखली जातेय. अशावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना मोठा झटका बसलाय. योगींच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. इतकंच नाही तर त्यांनी आजच अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात समाजवादी पक्षात प्रवेशही केलाय. अखिलेश यादव यांनी स्वत: त्याबाबत माहिती दिली आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच स्वामी प्रसाद मौर्य यांनी बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र, आता त्यांनी भाजपलाही रामराम ठोकला आणि समाजावादी पक्षाशी जवळीक साधली आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांची कन्या संघमित्रा मौर्य या भाजपच्या खासदार आहेत. वडिलांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असला तरी संघमित्रा मौर्य यांच्या निर्णयाबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही.

अखिलेश यादव यांचं ट्वीट

‘सामाजिक न्याय आणि समानतेचा लढा देणारे स्वामी प्रसाद मौर्य यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं समाजवादी पक्षात स्वागत आहे. सामाजिक न्याय का इन्कलाब होगा, बाईस बे बदलाव होगा’, अशा शब्दात अखिलेश यादव यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांचं पक्षात स्वागत केलं आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांचा योगींवर निशाणा

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात स्वामी प्रसाद मौर्य यांनी सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. ‘प्रतिकूल परिस्थिती आणि विचारसरणीत राहुनही कामगार, रोजगार आणि सहकार मंत्रीपदाची जबाबदारी अत्यंत जपून पार पाडली. असं असलं तरी दलित, शेतकरी, बेरोजगार युवा आणि लहान आणि मध्यम उद्योगाबाबत उपेक्षित वृत्तीमुळे उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे’, असं स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले.

इतर बातम्या : 

मोठी बातमी : पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली