TV9 Final Opinion Poll: यूपीत भाजपच नंबर वन, सपा दुसऱ्या क्रमांकावर, बसपा आणि काँग्रेसची सर्वात वाईट अवस्था; टीव्ही9चा ओपिनियन पोल काय सांगतो?

| Updated on: Feb 07, 2022 | 7:00 PM

उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचाराची (UP Assembly Election) रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या 10 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशात मतदान होणार आहे. एकूण सात टप्प्यात उत्तर प्रदेशात मतदान होणार आहे.

TV9 Final Opinion Poll: यूपीत भाजपच नंबर वन, सपा दुसऱ्या क्रमांकावर, बसपा आणि काँग्रेसची सर्वात वाईट अवस्था; टीव्ही9चा ओपिनियन पोल काय सांगतो?
यूपीत भाजपच नंबर वन, सपा दुसऱ्या क्रमांकावर, बसपा आणि काँग्रेसची सर्वात वाईट अवस्था; टीव्ही9चा ओपिनियन पोल काय सांगतो?
Follow us on

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचाराची (UP Assembly Election) रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या 10 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशात मतदान होणार आहे. एकूण सात टप्प्यात उत्तर प्रदेशात मतदान होणार आहे. त्यापूर्वीच टीव्ही9 चा फायनल ओपिनियन पोल आला आहे. या पोलमध्ये यूपीत भाजप (bjp) नंबर वन राहणार आहे. पण यावेळी भाजपला मोठ्या प्रमाणावर जागांचं नुकसानही होताना दिसत आहे. तर समाजवादी पार्टी दुसऱ्या क्रमांकावर जाणार असून यावेळी त्यांच्या जागाही वाढताना दिसत आहेत. मात्र, बहुजन समाज पार्टी (bsp) आणि काँग्रेस (congress) यावेळीही चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये.

उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याच्या 60 तास आधीच टीव्ही9 भारतवर्ष आणि पोलस्ट्रेटचा ओपिनियन पोल आला आहे. या पोलमध्ये भाजपला मोठं नुकसान होताना दिसत आहे. मात्र, तरीही भाजपला 205-221 जागा मिळण्याची शक्यता आहे. समाजवादी पार्टीला 144-159 जागा मिळताना दिसत आहेत. तर बहुजन समाज पार्टीला केवळ 21-31 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रसेला उत्तर प्रदेशात अवघ्या 2-7 जागा मिळणार असून इतरांच्या खात्यावर दोन जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुणाचा टक्का किती?

ओपिनियन पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान मिळणार याचा आकडाही समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपला 40.5 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. समाजवादी पार्टीला त्याखालोखाल 37 टक्के मते मिळणार आहेत. त्यामुळे समाजवादी पार्टी भाजपला टक्कर देताना दिसत आहे. बसपाला जास्त जागा मिळताना दिसत नसल्या तरी मतांची टक्केवारी चांगली मिळताना दिसत आहे. बसपाला 15.6 टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला केवळ 4.9 टक्के मते मिळणार असून इतरांना 2 टक्के मिळताना दिसत आहेत.

योगींनाच सर्वाधिक पसंती

या सर्व्हेत उत्तर प्रदेशातील नागरिक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामावर खूश असल्याचं दिसून येत आहे. तुम्ही कुणाच्या कामावर अधिक खूश आहात? असा सवाल उत्तर प्रदेशातील नागरिकांना विचारला असता 44.3 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या कामावर खूश असल्याचं सांगितलं. तर 37.8 टक्के लोकांनी अखिलेश यादव यांच्या कामावर खूश असल्याचं म्हटलं आहे.

 

संबंधित बातम्या:

TV9 Final Opinion Poll: 44.3 टक्के लोकांना मुख्यमंत्री योगींचे काम आवडले तर 37.8 टक्के लोकांची अखिलेश यांना सहमती

PM Modi Speech in Parliament: इन्हे आईना मत दिखाओ, वो आईना भी तोड देंगे, मोदींचा शेरो शायरीतून काँग्रेसवर घणाघाती हल्ला

PM Modi Speech in Parliament LIVE : पंतपधान मोदींचं भाषण लाईव्ह, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल