PM Modi Speech in Parliament LIVE : पंतपधान मोदींचं भाषण लाईव्ह, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

| Updated on: Feb 07, 2022 | 7:26 PM

Budget Session of Parliament LIVE : संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Live Speech) विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. हा एक टर्निंग आहे. आपण ही संधी गमावता कामा नये. मेन ऑर्डरवर आपला आवाज बुलंद राहिला पाहिजे. लीडरशीपसाठी आपण स्वतला कमी लेखू नये. असे म्हणत विरोधकांवर फटकेबाजी केलीय

PM Modi Speech in Parliament LIVE : पंतपधान मोदींचं भाषण लाईव्ह, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
मोदींची विरोधकांवर फटकेबाजी

नवी दिल्ली : संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Live Speech) विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली आहे. (Modi Speech in parliament) हा एक टर्निंग पॉईंट आहे. आपण ही संधी गमावता कामा नये. मेन ऑर्डरवर आपला आवाज बुलंद राहिला पाहिजे. लीडरशीपसाठी आपण स्वतला कमी लेखू नये. स्वातंत्र्याचा 75 वा महोत्सव ही एक संधी आहे. देश जेव्हा स्वातंत्र्याची शंबरी साजरी करेल तेव्हा आपण सामर्थ्यवान होऊ हा संकल्प केला पाहिजे. असे मोदी म्हणाले आहेत (Modi budget speech live) गेल्या काही वर्षात अनेक क्षेत्रात आपण मजबुतीने पुढे आलो. पीएम आवास योजना… गरीबांना राहण्यासाठी घरे असावे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पण आपण त्याला गती दिली. त्यामुळे गरीबांचे घर सुद्धा लाखोंपेक्षा अधिक किमतीचे होत आहे. ज्या गरीबाला पक्के घर मिळते तोही लखपतीच्या श्रेणीत येतो. गरीबांच्या घरात शौचालये आले आहेत. त्यामुळे उघड्यावर शौच करणं बंद झालं आहे. त्यामुळे कोण खुश नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोले लावले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Feb 2022 06:39 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    मोदींनी महागाईवरून काँग्रेसवर निशाणा साधताना नेहरूंचा उल्लेख केला

    आज मी नेहरूंचं नाव घेणारच

    नेहरू लाल किल्ल्यावरून म्हणाले होते, कधी कधी कोरियातली लढाईही भारतावर परिणाम करते, त्यामुळे महागाई वाढते.

    हे आमच्या नियंत्रणाच्या बाहेर जाते

    नेहरूंनी त्यावेळी हात वर केले

    देशाचे पहिले प्रधानमंत्री हात वर करतात

    अमेरिकेचाही नेहरूंना दाखला दिल्याचा मोदींकडून उल्लेख

    आम्ही पळून जाणारे लोक नाही

    आम्ही इमानदारीत प्रयत्न केले

  • 07 Feb 2022 06:35 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    महागाईवरून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

    मोदींनी चिदंमबरम यांना टार्गेट केलं

    पेपरमध्ये लेख लिहण्यावरून निशाणा

    आधी काँग्रेसवाले बोलायचे महागाई कमी करायला जादूची छडी नाही

    आता त्यावरूच कंगावा करत आहेत

  • 07 Feb 2022 06:30 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    आधी दुसऱ्या देशांवर निर्भरता जास्त होती

    आम्ही भारताला आत्मनिर्भर बनवलं

    संरक्षण क्षेत्रात भारताला मजबुती दिली

    जवानांनी याकडे करिअर म्हणून पाहवं, आम्ही तुमच्यासोबत

  • 07 Feb 2022 06:28 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    मेक इन इंडियाचा अर्थ आहे हफ्ते  बंद

    तिजोरी भरणे बंद

    काँग्रेसने देशातील युवकांचा अपमान केला

    काँग्रेस अपयशी ठरले म्हणून देशाला अपयशी करण्याचा प्रयत्न

  • 07 Feb 2022 06:26 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    काँग्रेसने मेक इन इंडियाची खिल्ली उडवली

    पण देशातल्या युवकांनी करून दाखवलं

    आता विरोधक मजाक होऊन बसले

  • 07 Feb 2022 06:25 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    यूपीत भाजपच नंबर वन

    सपा दुसऱ्या क्रमांकावर

    बसपा आणि काँग्रेसची सर्वात वाईट अवस्था

  • 07 Feb 2022 06:24 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    देशातले उद्योगपती कोरोना व्हायरस आहेत?

    काँग्रेसवाल्यांना मोदींचा थेट सवाल

    जे इतिहासापासून शिकत नाहीत

    ते इतिहासात जमा होतात

  • 07 Feb 2022 06:20 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    देशात क्रिएटिव्ह लोकांना पोषक वातावरण बनवलं

    युवकांची स्वप्नांसाठी नव्या विचारांची सुरूवात आम्ही केली

    आधी युवकांची अवस्था बिकट होती

    सात वर्षात साठ हजार स्टार्टअप झाले

  • 07 Feb 2022 06:12 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    काँग्रेस जमिनीपासून दूर लोटलेला पक्ष

    तुम्ही फाईलीत हवला, आम्ही लाईफ बदलतोय

  • 07 Feb 2022 06:10 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    आत्ता वेळेनुसार बदल घडवावा लागेल

    अजूनही काही लोक गुलामीच्या मानसिकतेत

    मोदींनी वाचला योजनांचा पाढा

    काँग्रेसच्या काळात अपूर्ण योजना आम्ही पूर्ण केल्या

  • 07 Feb 2022 06:08 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    महालात राहणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा कळणार नाहीत

    छोट्या शेतकऱ्यांविरोधत काँग्रेसला तिरस्कार का आहे?

  • 07 Feb 2022 06:07 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    भारतात शेतकऱ्यांवर वाईट वेळ येऊ दिली नाही

    भारताने कोरोनातही मोठे निर्णय घेतले

    खतांची आयात वाढवली आहे

  • 07 Feb 2022 06:01 PM (IST)

    पंतप्रधान मोदी Live

    अनेक मोठ्या योजना आणल्या

    गेल्या काही वर्षात अनेक क्षेत्रात आपण मजबुतीने पुढे आलो. पीएम आवास योजना... गरीबांना राहण्यासाठी घरे असावे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. पण आपण त्याला गती दिली. त्यामुळे गरीबांचे घर सुद्धा लाखोंपेक्षा अधिक किमतीचे होत आहे. ज्या गरीबाला पक्के घर मिळते तोही लखपतीच्या श्रेणीत येतो. गरीबांच्या घरात शौचालये आले आहेत. त्यामुळे उघड्यावर शौच करणं बंद झालं आहे. त्यामुळे कोण खुश नाही.

    तुमचे प्रेम अजरामर राहो (काँग्रेस खासदारांकडे पाहून. एका खासदाराने टोकल्यानंतर मोदी बसले. त्यानंतर ते बोलेले)

    चुलीपासून मुक्ती मिळवली

    चुलीतील धुरात काम करणाऱ्या आई... आज तिच्या घरात गॅस आला आहे. गॅस घरात असणं हे स्टेट्स सिम्बॉल बनलं होतं. दादांना मध्येमध्ये संधी दिली पाहिजे. या वयातही दादा बचपनचं आनंद घेत आहे.

    गरिबांसाठी खाती उघडली

    सरकारकडून मिळणारी रक्कम थेट गरीबांच्या खात्यात जात आहे. तुम्हाला लोकांची नस माहीत असती, तुम्ही जनतेत मिसळले असते तर तुम्हाला या गोष्टी कळल्या असत्या. तुमच्यापैकी अनेक लोकांचे सुई-काटे २०१४मध्ये अडकलेले आहेत. त्यातून तुम्ही बाहेर पडत नाहीत. तुम्ही स्वत:ला एका मानसिक अवस्थेत अडकवून ठेवलं आहे. लोकांनी तुम्हाला ओळखलं आहे. काही आता ओळखत आहेत. तर काही भविष्यात ओळखतील.

    काँग्रेसला अनेक राज्यांनी हद्दपार केलं

    नागालँडच्या लोकांनी शेवटी १९८८मध्ये काँग्रेसला मत दिलं होतं. २४ र्ष झालं. ओडिसाने १९९५ मत दिलं होतं. २७ वर्ष झाले. तुमची एन्ट्री झाली नाही. गोव्यात १९९४मध्ये तुम्हाला पूर्ण बहुमत मिळालं होतं. २८ वर्ष झाली गोव्याने स्वीकारलं नाही. १९८८ त्रिपुरात मत दिलं होतं. ३४ वर्षापूर्वी, काँग्रेसचा हाल आहे यूपी, बिहार आणि गुजरात म्हणजे शेवटी १९९५मध्ये ३७ वर्षापूर्वी मतदान केलं होतं. गेल्यावर्षी पश्चिम बंगालमध्ये १९७२ म्हणजे ५० वर्षापूर्वी मतदान केलं होतं. तामिळनाडूच्या लोकांनी १९६२ म्हणजे ६० वर्षापूर्वी संधी दिली होती. तेलंगना बनविण्यचां श्रेय घेता पण त्यांनीही तुम्हाला संधी दिली नाही. झारखंडचा जन्म झाला २० वर्ष झाले. पूर्णरुपने स्वीकारलं नाही. मागच्या दरवाजाने ते येत आहे.

    काँग्रेसवर हल्लाबोल

    तुम्ही मर्यादेचं पालन केलं असतं आणि या जागेचा उपयोग केला नसता तर... देशाचं दुर्भाग्य आहे की तुम्ही सदनासारखी पवित्र जागा देशासाठी उपयोगी व्हायला हवी होती. तुम्ही राजकारणासाठी आणली म्हणून उत्तर प्रश्न निवडणुकीच्या निकालाचा नाही. सवाल तुमच्या नेक दिलीचा आहे. इतके वर्ष सत्तेत राहिल्यानंतरही देशातील जनता त्यांना का नाकारत आहे. एवढं सारं झाल्यानंतरही आम्ही एक निवडणूक हरल्यावर महिन्यानंतर एको सिस्टीम काय काय करते तुम्ही एवढ्या निवडणुका हरल्यानंतरही तुमचा अहंकार जात नाही. अधिररंजन यांनी अनेक शेर ऐकवले. मीही संधी घेतो. अहंकाराचीच गोष्ट निगाळ

    संसदेत शेरोशायरी

    वो जब दिन को रात कहे तो तुरंत मान जाओ नही मानोगे तो वो दिन में नकाब ओढ लेंगे जरुरत हुई तो हकीकत को थोडा बहोत मरोड लेंगे वो मगरुर है खुद की समज पर बेइंतहा इन्हे आयना मत दिखाओ, वो आयने को भी तोड देंगे

  • 07 Feb 2022 05:58 PM (IST)

    लोकसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

    लॉकडाउन असताना मुंबईत रेल्वे सोडण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केलं प्रवाशांना तिकीट दिली

    महाराष्ट्रातलं स्थलांतर करण्यासाठी काँग्रेसने मदत केली

    महाराष्ट्रावरचे ओझं कमी करण्यासाठी उत्तर प्रदेश बिहार मधील कामगारांना पाठवले गेले

    कोरोना काळात एका जागी थांबन गरजेचे असताना काँग्रेसने पातळी सोडली

    मोदींचा लोकसभेत जोरदार हल्लाबोल

    दिल्ली सरकारनेही कोरोना काळात लॉकडाऊन काळात नागरिकांचे स्थलांतर केले

  • 07 Feb 2022 05:57 PM (IST)

    इथे पाहा मोदींची संपूर्ण भाषण

Published On - Feb 07,2022 5:51 PM

Follow us
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.