AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Assembly Election 2022 | भाजपला आणखी मोठा झटका, सातव्या आमदाराचा पक्षाला रामराम, केले गंभीर आरोप

भाजपला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील आमदार डॉ. मुकेश वर्मा यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्मा यांचा राजीनाम आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. वर्मा उत्तरप्रदेशमध्ये मासवर्गीयांचे नेते म्हणून ओळखले जातात.

UP Assembly Election 2022 | भाजपला आणखी मोठा झटका, सातव्या आमदाराचा पक्षाला रामराम, केले गंभीर आरोप
MUKESH VARMA
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 12:41 PM
Share

लखनौ : निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक  (UP Assembly Election 2022)जाहीर केल्यानंतर येथे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप (BJP) पक्षात तर मोठी उलथापालथ होताना दिसतेय. येथे सरकारमधील मंत्री तसेच काही आमदार भाजपला सोडचीठ्ठी देत आहेत. काही दिवसांपूर्वी पाच आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आता पुन्हा एकदा भाजपला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील आमदार डॉ. मुकेश वर्मा (Mukesh Verma) यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्मा यांचा राजीनामा आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. वर्मा उत्तरप्रदेशमध्ये मासवर्गीयांचे नेते म्हणून ओळखले जातात. वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या 7 वर पोहोचली असून भाजपसाठी ही मोठी हानी असल्याचे म्हटले जात आहे.

भाजपत मागासवर्गीय नेत्यांना सन्मान दिला जात नाही

मुकेश वर्मा यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनाम दिला आहे. त्यांनी भाजपच्या धोरणांवर कठोर टीका केली आहे. मागील पाच वर्षात दलित, मागास वर्गातील नेत्यांना भाजपमध्ये योग्य स्थान दिलं गेलं नाही. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्य़ोजक आणि व्यापाऱ्यांचीही घोर उपेक्षा झाली. त्यामुळे कुटनीतीचे धोरण अवलंबल्यामुळे राजीनामा देत असल्याचे वर्मा यांनी सांगितले. तसेच स्वामी प्रसाद मौर्य आमचे नेते आहेत. मी त्यांच्या सोबत आहे, असेदेखील वर्मा यांनी आपल्या राजीनामापत्रात सांगितले आहे.

आतापर्यंत सात आमदारांचा राजीनामा 

दरम्यान, वर्मा यांनी राजीमाना दिल्यानंतर आता भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या सातवर पोहोचली आहे. याआधी स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच गुर्जर समाजाचे नेते आणि आमदार अवतार सिंह भडाना यांनी रालोदमध्ये प्रवेश केला. तसेच आणखी चार बड्या नेत्यांनी मोठा झटका दिला होता. उत्तर प्रदेश सरकारमधील स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर बांदाच्या तिंदवारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बृजेश प्रजापती यांनी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर शाहजहापूरच्या तिलहर मतदारसंघाचे आमदार रोशनलाल वर्मा यांनी भाजपची साथ सोडली. त्याचबरोबर कानपूरच्या बिल्हौरचे आमदार भगवती प्रसाद यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे.

इतर बातम्या :

Assembly Elections 2022 : यूपी, गोव्यासह मणिपुरात कमळ कोमेजणार? ओपनिअन पोल भाजपचं टेन्शन वाढवणारा

UP Election : उत्तर प्रदेशात काका-पुतण्या पुन्हा एकत्र, अखिलेश आणि शिवपाल यादव 5 वर्षानंतर एकत्र निवडणूक लढवणार

Goa Elections 2022 | गोवा विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, महाविकास आघाडीचा प्रयत्न फसणार ?

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं