Uttarakhand Election Result 2022 : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा आज गुलाल! सत्ता कुणाची? एक्झिट पोलचा अंदाज काय?

| Updated on: Mar 10, 2022 | 7:26 AM

विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताचा दावा करत असलं तरी स्थानिक पातळीवर भाजप नेते अन्य पक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरु केलीय. दुसरीकडे काँग्रेसनंही निवडणूक निकालापूर्वी सर्व पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. दोन्ही पक्षाचे मोठे नेते देहरादूनमध्ये दाखल झाले आहेत. असं असलं तरी विजयाचा गुलाल कुणाला लागणार? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Uttarakhand Election Result 2022 : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा आज गुलाल! सत्ता कुणाची? एक्झिट पोलचा अंदाज काय?
हरिश रावत, पुष्करसिंह धामी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 चि ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिल्या जात असेलल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result) आज लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताचा (Absolute majority) दावा करत असलं तरी स्थानिक पातळीवर भाजप नेते अन्य पक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरु केलीय. दुसरीकडे काँग्रेसनंही निवडणूक निकालापूर्वी सर्व पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. दोन्ही पक्षाचे मोठे नेते देहरादूनमध्ये (Dehradun) दाखल झाले आहेत. असं असलं तरी विजयाचा गुलाल कुणाला लागणार? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

उत्तराखंडमधील 70 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. 70 जागांसाठी सर्व राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण 632 उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. बहुतांश जागांवर सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात चुरशीची शक्यता आहे. तर आम आदमी पक्षाने (आप) देखील सर्व 70 जागांवर उमेदवार उभे करून अनेक जागांवर निवडणूक तिरंगी करण्याचा प्रयत्न केलाय.

किती टक्के मतदानाची नोंद?

दरम्यान, यंदा उत्तराखंडमध्ये एकूण 65.10 टक्के मतदानाची नोंद झाली. 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान कमी झालंय. 2017 च्या निवडणुकीत उत्तराखंडमध्ये 65.64 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा हरिद्वार जिल्ह्यात सर्वाधिक 74.20 टक्के, तर अल्मोडा जिल्ह्यात सर्वात कमी 53.12 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

एक्झिट पोलच्या अंदाज काय?

TV9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 31 ते 33 जागा मिळतील. तर काँग्रेसला 33 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार करण्यास काँग्रेस यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एक्झिट पोलनुसार आम आदमी पार्टीला 0-3 जागा, तर इतरांना 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.

एबीपी-सी वोटरच्या पोलनुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, सत्ताधारी भाजपला 26-32 जागा मिळतील. तर दुसरीकडे काँग्रेसला 32-38 जागा मिळताना मिळण्याचा अंदाज आहे. तर आम आदमी पक्षाला 2 जागा आणि इतरांना 3-7 जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार राज्यात काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळू शकते. मात्र भाजपही बहुमतापासून दूर नसल्याने येथेही अन्य उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार पुन्हा भाजपची सत्ता

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 37 जागा मिळू शकतात. दुसरीकडे, काँग्रेसला 31 जागा मिळू शकतात. तसेच आम आदमी पक्षाच्या कोर्टात एक जागा जाऊ शकते. तर इतरांना जागा मिळत नाही. टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या जागाही वाढणार आहेत. आम आदमी पक्षाला फक्त आपले खाते उघडता येणार आहे.

2017 च्या निवडणुकीत काय स्थिती?

2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवली होती. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री हरिश रावत यांचा दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला होता. हरिद्वारमध्ये हरिश रावत यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला. तर किच्चा मतदारसंघातून रावत 92 मतांनी हरले होते.

टीव्ही 9 मराठीवर सुपरफास्ट निकाल :

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात अचूक आणि सर्वात जलद निकाल तुम्ही दिवसभर टीव्ही 9 मराठी आणि वेबसाईटवरही पाहू शकता. त्यासाठी https://www.tv9marathi.com/ या लिंकवर क्लिक करा.

इतर बातम्या :

‘आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं’, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

Assembly Election 2022 : दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं; गोव्यात विक्रमी मतदान, उत्तर प्रदेश, उत्तराखंडची स्थिती काय?