Assembly Election 2022 : दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं; गोव्यात विक्रमी मतदान, उत्तर प्रदेश, उत्तराखंडची स्थिती काय?

तीनही राज्यातील संध्याकाळी 5 पर्यंतच्या आकडेवारीनुसार गोव्यात विक्रमी 75 टक्के मतदान पार पडली. तर उत्तर प्रदेशात संध्याकाळी 5 पर्यंत 60.44, तर उत्तराखंडमध्ये 59.37 टक्के मतदानाची नोंद झाली. तर संपूर्ण आकडेवारी थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे.

Assembly Election 2022 : दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं; गोव्यात विक्रमी मतदान, उत्तर प्रदेश, उत्तराखंडची स्थिती काय?
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 8:16 PM

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2022) दुसऱ्या टप्प्यात आज गोवा (Goa), उत्तराखंड (Uttarakhand) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) प्रदेशात मतदान पार पडलं. गोवा आणि उत्तराखंडसाठी एकाच टप्प्यात निवडणूक पार पडली. तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान झालं. तीनही राज्यातील संध्याकाळी 5 पर्यंतच्या आकडेवारीनुसार गोव्यात विक्रमी 75 टक्के मतदान पार पडली. तर उत्तर प्रदेशात संध्याकाळी 5 पर्यंत 60.44, तर उत्तराखंडमध्ये 59.37 टक्के मतदानाची नोंद झाली. तर संपूर्ण आकडेवारी थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे.

सोमवारी पार पडलेल्या मतदानात तीनही राज्यात मिळून विधानसभेच्या 165 जागांसाठी 1 हजार 519 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. उत्तर प्रदेशाात दुसऱ्या टप्प्यात एकूण 9 जिल्ह्यात मतदान झालं. त्यात बिजनौर, सहारनपूर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बदायूं आणि शाहजहांपूर या जागांचा समावेश आहे. या 9 जिल्ह्यातील विधानसभेच्या 55 जागांसाठी मतदान पार पडलं. यात 2 कोटी 2 लाख मतदारांनी सहभाग नोंदवला.

तर उत्तराखंडमधील सर्व 70 जागांसाठी सोमवारी मतदान पार पडलं. उत्तराखंडमधील 82 लाख पेक्षा अधिक मतदारांनी 632 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएममध्ये कैद केलं आहे. त्याचबरोबर गोव्यातील सर्व 40 जागांसाठीही आज मतदान झालं. या जागांसाठी एकूण 301 उमेदवार रिंगणात होते. गोव्यात भाजप, काँग्रेससह आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी आणि अन्य छोट्या पक्षांनीही नशीब आजमावलं.

गोव्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

गोव्यात प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल अलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई (जीएफपी), सुदीन ढवळीकर (एमजीपी), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर आणि आपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमित पालेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करत गोव्याचा निवडणुकीत उडी घेतली आहे. तर अरवींद केजरीवाल यांची आम आदमी पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवली आहे.

इतर बातम्या :

अमित शाह म्हणाले, ‘ना घर का ना घाट का’, आता हरीश रावत यांचं ‘जरुरत पडी तो काटुंगा भी’ म्हणत जोरदार प्रत्युत्तर

Hijabनंतर आता आणखी एक Video Viral; यूझर्स म्हणतायत, जग जातंय पुढे भारत मात्र चाललाय मागे!

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.