अमित शाह म्हणाले, ‘ना घर का ना घाट का’, आता हरीश रावत यांचं ‘जरुरत पडी तो काटुंगा भी’ म्हणत जोरदार प्रत्युत्तर

प्रचार संपण्यापूर्वी हरीश रावत यांनी भाजपवर तीखट शब्दात हल्ला चढवला होता. 'भाजपनं केलेल्या सर्व आश्वासनांवर उत्तराखंडीयत हावी होती. त्यामुळेच पंतप्रधान मोदींना एवढी वर्षे ज्या टोपीची आठवणही आली नाही. त्यांना ती टोपी उत्तराखंडमध्ये जाऊन घालावी लागली. उत्तराखंडमध्ये जनता विरुद्ध भाजप असं मतदान होत आहे,' अशी टीका रावत यांनी केली.

अमित शाह म्हणाले, 'ना घर का ना घाट का', आता हरीश रावत यांचं 'जरुरत पडी तो काटुंगा भी' म्हणत जोरदार प्रत्युत्तर
अमित शाह, हरीश रावत
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 7:52 PM

नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या (Uttarakhand Assembly Election) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांच्यात जोरदार वाक् युद्ध पाहायला मिळालं. प्रचार संपण्यापूर्वी हरीश रावत यांनी भाजपवर तीखट शब्दात हल्ला चढवला. ‘भाजपनं केलेल्या सर्व आश्वासनांवर उत्तराखंडीयत हावी होती. त्यामुळेच पंतप्रधान मोदींना एवढी वर्षे ज्या टोपीची आठवणही आली नाही. त्यांना ती टोपी उत्तराखंडमध्ये जाऊन घालावी लागली. उत्तराखंडमध्ये जनता विरुद्ध भाजप असं मतदान होत आहे,’ अशी टीका रावत यांनी केलीय.

हरीश रावत पुढे म्हणाले की, अमित शाह, नरेंद्र मोदी, योगी आणि त्यांच्या तमाम मंत्रिमंडळाचा मी आभारी आहे. सर्वजण दोन-दोन, चार-चार काठ्या माझ्यावर चालवत आहेत. अमित शाह यांनी तर खूप मोठी गोष्ट केलीय. धन्य आहेत ते आणि भाजपची संस्कृती. अमित शाह यांनी ना घर का ना घाट का अशा शब्दात रावत यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर बोलताना जर ते आपल्या राजकीय विरोधकांना कुत्रा समजतात तर ती त्यांची समज आहे, असंही रावत म्हणाले.

‘उत्तराखंडसाठी भुंकावं लागलं तर मी भुंकेन, बोलावं लागलं तर बोलेन’

इतकच नाही तर ‘जेवढी माझी समज आहे आमच्याकडे कुत्र्याला भैरोचा अंश मानतात, तो चौकीदार आहे. भैरों देवतांचे चौकीदार आहेत, तर कुत्रा घराचा. जर मी कुत्रा असेल तर मी उत्तराखंडचा चौकीदार आहे. जर उत्तराखंडसाठी भुंकावं लागलं तर मी भुंकेन, बोलावं लागलं तर बोलेन आणि एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी की, जर चावा घ्यावा लागला तर तोही मी घेईन’, अशा शब्दात रावत यांनी शाहांना प्रत्युत्तर दिलं आहे.

इतर बातम्या : 

आसामचे मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्याबाबत काय म्हणाले? काँग्रेसने फोटोला काळं फासलं

Video : ‘नाना.. हिंमत असेल तर सागर बंगल्यावर येऊन दाखव’, प्रसाद लाड यांच्याकडून एकेरी उल्लेख, पटोलेंना थेट आव्हान

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.