‘आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं’, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही तर राज यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली. राज यांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

'आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं', संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार
राज ठाकरे, संजय राऊतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 9:56 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही तर राज यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली. राज यांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमचं राजकारण हे नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी केलाय.

‘काही लोक आजारी नसतानाही सक्रीय नसतात’

राज ठाकरे यांनी आपली नक्कल केली त्यावर काय बोलाल? असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊतांना विचारला. त्यावेळी ‘नक्कल केली चांगील गोष्ट आहे. नक्कल मोठ्या माणसांची करतात. तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी स्थिती आहे. ईडीनं आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलेलो नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. जे सत्य आहे त्यावर शिवसेना बोलणार डुप्लिकेट काही नाही. आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबद्दल उद्या पाहावं लागेल. काही लोक आजारी नसताना ही सक्रीय नसतात. मुख्यमंत्र्या इतक कुणीच सक्रिय नाही, म्हणून तर राज्य पुढं चाललंय’, असं संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंकडून संजय राऊतांची नक्कल

राज ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावेळी राज यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली. ‘ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळं नॉर्मल. एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळं साधं व्यवस्थित बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटलं ये. आज.. इखे जमलेले सर्व…. अरे आता नीट बोलत होता. काय प्रॉब्लेम झाला. डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या पाहत आहेत हे. ते उद्या काय शिकतील? असा सवाल करत राज यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली.

इतर बातम्या :

Raj Thackeray : मनसेनं सोळा वर्षात काय कमावलं? राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Video : राज्यपालांना शिवराय कळलेत का? राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.