गणेश उत्सवातील सर्वांचं प्रचंड आवडतं गाणं, जे ऐकलं तरी दिवसभर लोक गुणगुणतात

गणेश चतुर्थीच्या उत्सवात धुमधडाक्यात वाजतं हे 13 वर्षांपूर्वीचं गाणं, आजही गणपती उत्सवात हे गाणं नक्की ऐकायला मिळतं.

गणेश उत्सवातील सर्वांचं प्रचंड आवडतं गाणं, जे ऐकलं तरी दिवसभर लोक गुणगुणतात
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 07, 2026 | 2:07 PM

गणेश चतुर्थीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 14 सप्टेंबरला देशभरात गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जाणार आहे. घराघरांत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासोबतच विविध गणेश मंडळांच्या मंडपांमध्येही जय्यत तयारी सुरू झाली आहे. ढोल-ताशांचा गजर, आरती आणि भक्तिमय वातावरणासोबतच गणपती उत्सवात काही गाणीही हमखास ऐकायला मिळतात. यापैकीच एक गाणं म्हणजे ‘साडा दिल वी तू’, ज्याला ‘गा गा गा गणपती’ या नावानेही ओळखलं जातं.

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ABCD – Any Body Can Dance’ या चित्रपटातील हे गाणं गणपती बाप्पाला समर्पित करण्यात आलं आहे. भक्ती आणि नृत्याचा भन्नाट संगम असलेलं हे गाणं गणेशोत्सवातील उत्साह आणखी वाढवतं. त्यामुळे गणपती मंडपांपासून विविध सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत हे गाणं आजही मोठ्या उत्साहात वाजवलं जातं.

पंजाबी-हिंदी गाण्याचा हटके अंदाज

‘साडा दिल वी तू’ हे पारंपरिक भक्तिगीत नसून पंजाबी-हिंदी शब्द, रॅप, ढोल आणि पारंपरिक आरतीचा सुरेल मिलाफ असलेलं एनर्जेटिक डान्स ट्रॅक आहे. गाण्यातील ‘गा गा गा गणपती… बाप्पा मोरया’ हा भाग विशेष लोकप्रिय झाला आहे.

गाण्याचे बोल बाप्पाप्रती असलेलं प्रेम आणि भक्ती व्यक्त करतात. त्यामुळे भक्तिमय वातावरणासोबतच या गाण्यावर तरुणाई मोठ्या उत्साहाने थिरकताना दिसते. गणेशोत्सवाच्या मिरवणुका आणि मंडपांमध्ये हे गाणं वाजलं की वातावरणात वेगळीच ऊर्जा निर्माण होते.

प्रभुदेवासह दिग्गज डान्सर्सचा जलवा

या गाण्याला खास बनवण्यात त्यातील नृत्याचा मोठा वाटा आहे. गाण्यात प्रभुदेवा, गणेश आचार्य, धर्मेश येलांडे यांच्यासह इतर डान्सर्सचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळतो. त्यामुळे गाण्याच्या संगीतासोबतच त्यातील डान्स मूव्ह्जही प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

‘ABCD’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रेमो डिसूझा यांनी केलं होतं. गाण्याला सचिन-जिगर यांनी संगीत दिलं असून, मयूर पुरी यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत. गायिका हार्ड कौर यांच्या आवाजातील जोशामुळे या गाण्याला आणखी वेगळी ऊर्जा मिळाली.

गणेशोत्सवातील आवडतं गाणं

गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, उत्साह आणि नृत्य यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. ‘साडा दिल वी तू’ या गाण्याने या तिन्ही गोष्टींचा उत्तम मेळ साधला आहे. त्यामुळे 2013 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतरही हे गाणं गणपती उत्सवातील लोकप्रिय गाण्यांपैकी एक राहिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us