
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री गिरिजा ओक सर्वत्र चर्चेत आहे. गिरिजा हिने फक्त मराठी नाही हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमात देखील गिरीजा हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गिरिजा हिने आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आर्यन तुरुंगात असताना शाहरुख याची अवस्था कशी होती, याबद्दल अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. तेव्हा शाहरुख याने सिनेमाची शुटिंग देखील बंद केलं होतं. 2023 मध्ये आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. त्यावेळी शाहरुख खान कठीण परिस्थितीतून जात होता… असं खुद्द गिरिजा म्हणाली. कारण तेव्हा गिरिजा आणि शाहरुख खान याने जवळपास दोन वर्ष एकत्र काम केलं होतं.
गिरिजा ओक म्हणाली, ‘माझ्या शाहरुख याच्यासोबत माझ्या खूप आठवणी आहेत. जवान सिनेमाचं प्रचंड काम असल्यामुळे मला मुलाला भेटता देखील येत नव्हतं.. अशी चर्चा इतर कलाकारांसोबत देखील सुरु होती. आमचं बोलणं ऐकल्यानंतर शाहरुख देखील आला आणि म्हणाला, मला देखील माझ्या मुलांना भेटता येत नाही. अबराम शाळेत गेलेला असतो… सुहाना हिला देखील भेटता येत नाही… आर्यन त्याच्या कामात व्यस्त असतो.. म्हणून मी सुहाना हिला सेटवर भेटायला बोलवतो…’ असं किंग खान म्हणालेला…
किंग खान याच्याबद्दल सांगत गिरिजा म्हणाली, ‘आर्यन खान केस सुरु झाली तेव्हा शाहरुख खानसोबत शुटिंग करत होती. जवळपास 3 – 4 महिने ती केस सुरु होती. तेव्हा शाहरुख खान याने कोणत्या इव्हेंटला हजेरी लावली नव्हती… तो ‘जवान’ सिनेमाची देखील शुटिंग करत नव्हता… तेव्हा कोणीच त्याला संपर्क देखील करू शकत नाव्हतं… ‘जवान’ सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतरच आम्ही त्याला भेटलो आणि तोपर्यंत कदाचित केस देखील संपली होती… ‘ असं गिरिजा म्हणाली.
2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता आणि या छाप्याचे नेतृत्व एनसीबी मुंबईचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केलं होतं. तेव्हा आर्यन याला अटक करण्यात आली. जवळपास 25 दिवस आर्यन तुरुंगात होता..