AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DDLJ | ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ची 25 वर्षे पूर्ण, ‘राज-सिमरन’चा नवा अवतार दिसणार!

20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झालेला 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट आता आणखी एक इतिहास घडवणार आहे.

DDLJ | ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ची 25 वर्षे पूर्ण, ‘राज-सिमरन’चा नवा अवतार दिसणार!
| Updated on: Oct 19, 2020 | 3:10 PM
Share

मुंबई : ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून अनेक विक्रम केले आहेत. आदित्य चोप्राच्या या चित्रपटाने ‘डर’ आणि ‘बाजीगर’च्या शाहरुख खानला ‘किंग ऑफ रोमान्स’ बनवले होते. तर, काजोल आणि शाहरुखची जोडी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडी बनली होती. राज आणि सिमरनच्या या प्रेमकथेचे लोक इतके वेडे झाले की, आजही ते मुंबईतील ‘मराठा मंदिरात’ हा चित्रपट बघायला जातात. 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता आणखी एक इतिहास घडवणार आहे. चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने लंडनमध्ये शाहरुख आणि काजोल अर्थात राज आणि सिमरन यांचा कांस्य पुतळा बसवला जाणार आहे. (25 years of ‘Dilwale Dulhania Le Jayenge’: Shah Rukh Khan-Kajol’s statue to be part of London’s ‘Scenes in the Square’)

लंडनमध्ये बॉलिवूड चित्रपटातील पात्रांचा पुतळा उभारण्याची ही पहिली वेळ आहे. ज्यामध्ये चित्रपटाचे (Dilwale Dulhania Le Jayenge) एक दृश्य रिक्रीएट केले जाणार आहे. हा पुतळा लिसेस्टर स्क्वेअरमध्ये ‘सीन इन द स्क्वेअर’ म्हणून स्थापित केला जाणार आहे. जो या चित्रपटाची आणि बॉलिवूडची लोकप्रियता जगभरात दाखवणार आहे. ‘हार्ट ऑफ लंडन बिझिनेस अलायन्स’ चे मार्क विल्यम्स यांनी ही माहिती दिली आहे.

प्रसिद्ध चित्रपटांचा सन्मान

गेल्याच सप्टेंबरमध्ये लिसेस्टर स्क्वेअरमध्ये हॅरी पॉटरचा पुतळा बसविण्यात आला. यापूर्वी येथे ‘लॉरेल अँड हार्डी’, ‘बग्स बन्नी’, ‘सिंगिंग इन द रेन’, ‘जीन केली’, ‘मेरी पॉपपिन्स’, ‘मिस्टर बीन’, ‘पॅडिंग्टन अँड सुपरहिरोज’, ‘बॅटमॅन’ आणि वं’डर वूमन’ यांचे पुतळे स्थापित केले गेले आहेत.( 25 years of ‘Dilwale Dulhania Le Jayenge’: Shah Rukh Khan-Kajol’s statue to be part of London’s ‘Scenes in the Square’)

‘डीडीएलजे’ चित्रपटाची क्रेझ

‘डीडीएलजे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) चित्रपटाची क्रेझही लोकांच्या डोक्यावरुन उतरलेली नाही. जेव्हा जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर लागतो, तेव्हा बहुतेक लोकांना चॅनेल बदलावे असे वाटतच नाही. चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित अशा बर्‍याच कथा आहेत ज्या वाचून किंवा ऐकून आजही लोक आश्चर्यचकित होतात. या चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याचवेळी सप्टेंबर 1995मध्ये आमिर खानचा ‘रंगिला’ चित्रपटही प्रदर्शित झाला  होता. त्यावर्षी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दोन्ही चित्रपटांना एकाचवेळी अनेक नामांकने मिळाली होती.

शाहरुख-आमिरची स्पर्धा

शाहरुख-आमिर दोघांनाही ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चे नामांकन मिळाले होते. बॉलिवूड अवॉर्ड्स शोमध्ये कधीच उपस्थित नसणारा आमिर मात्र तेव्हा हजर होता. आपण हा पुरस्कार जिंकू याची त्याला खात्री होती, पण शाहरुखला हा पुरस्कार मिळाला. म्हणून या दिवसापासून आमिरने चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जाणे बंद केले, असे म्हटले जाते.

(25 years of ‘Dilwale Dulhania Le Jayenge’: Shah Rukh Khan-Kajol’s statue to be part of London’s ‘Scenes in the Square’)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.