धमकी देण्यासाठी आजही हे गाणं वापरलं जात, 55 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही लोक..

55 वर्षांपूर्वीचं धर्मेंद्र-आशा पारेख यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे आज पण एखाद्याला धमकी देण्यासाठी वापरले जाते. आनंद बख्शी यांचे शब्द आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे आजही हे गाणं सुपरहिट.

धमकी देण्यासाठी आजही हे गाणं वापरलं जात, 55 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही लोक..
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 08, 2026 | 3:59 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील 70 चे दशक हे दर्जेदार संगीत आणि अविस्मरणीय गाण्यांसाठी विशेष ओळखले जाते. या काळात अनेक अशी गाणी तयार झाली जी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या अजरामर गाण्यांचे श्रेय केवळ गायक-गायिकांना नाही, तर त्यामागे शब्दांची जादू निर्माण करणाऱ्या गीतकारांनाही तितकेच जाते. याच काळातील एक गाणे म्हणजे ‘मार दिया जाए कि छोड़ दिया जाए’. तब्बल 55 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे.

1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेरा गांव मेरा देश’ या चित्रपटातील हे गाणे आहे. राज खोसला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि दमदार संगीत यामुळे हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी आणि कल्ट चित्रपटांपैकी एक ठरला. चित्रपटातील अनेक गाणी गाजली, मात्र ‘मार दिया जाए कि छोड़ दिया जाए’ या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.

या गाण्याला लता मंगेशकर यांनी आपला आवाज दिला होता. त्यांच्या सुरेल आणि भावपूर्ण आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली. गाण्याचे चित्रीकरण आशा पारेख, धर्मेंद्र, विनोद खन्ना, लक्ष्मी छाया आणि जयंत यांच्यावर करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे गाणं केवळ मनोरंजनासाठी नाही तर चित्रपटातील प्रसंग आणि कथानकातील भावनांना पुढे नेणारे होते.

सिकंदर आणि राजा पोरसच्या कथेने सुचली गाण्याची ओळ

‘मार दिया जाए कि छोड़ दिया जाए’ या गाण्याच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा सांगितला जातो. गाणे लिहिताना आनंद बक्षी यांना त्यांच्या शालेय जीवनातील एक कथा आठवली. ही कथा होती सिकंदर आणि राजा पोरस यांची.

इतिहासातील या कथेनुसार, सिकंदरने भारतावर आक्रमण केल्यानंतर राजा पोरसला कैद केले होते. त्यानंतर पोरसचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. त्याला ठार मारायचे की सोडून द्यायचे, हा पेच निर्माण झाला. याच प्रसंगातील ‘मार दिया जाए कि छोड़ दिया जाए’ ही कल्पना आनंद बक्षी यांच्या मनात घर करून राहिली.

याच एका विचाराला त्यांनी चित्रपटातील प्रसंगाशी जोडले आणि त्यातून या गाण्याचा जन्म झाला. म्हणजेच, शालेय जीवनात ऐकलेली एक जुनी ऐतिहासिक कथा आणि त्या कथेतील एक साधी ओळ आनंद बक्षींच्या कल्पनाशक्तीतून थेट एका अजरामर गीतात रूपांतरित झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us