अभिनेत्री 7 महिन्यांची प्रग्नेंट असतानाच विमान अपघातात निधन; बॉलिवूडमधील सर्वात भयंकर घटना!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे नुकतेच विमान अपघातात निधन झाले. या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला. त्यांच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे. त्याचप्रमाणे, एका प्रसिद्ध अभिनेत्रीचाही दुःखद मृत्यू झाला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक अभिनेते- अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या एका अभिनेत्रीचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला होता. या अभिनेत्रीच्या अकाली निधनाने संपूर्ण देश हादरून गेला होता.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत केले होते काम
अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेली ही अभिनेत्री फक्त ३१ वर्षांची होती जेव्हा तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबीयांना शेवटच्या क्षणी तिचे चेहरा पाहण्याचीही संधी मिळाली नाही. दुःखाची गोष्ट म्हणजे ती अभिनेत्री तेव्हा ७ महिन्यांची गर्भवती होती. ही अभिनेत्री एकेकाळी एक्टिंगच्या जगात रेखा आणि हेमा मालिनींना टक्कर देणारी होती.
अमिताभ यांच्यासोबत फ्लॉप, पण घराघरात हिट
अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सूर्यवंशम’ या चित्रपटात दिसलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सौंदर्या होत्या. साउथ इंडस्ट्रीत त्यांनी खूप नाव कमावले होते. त्या केवळ कामासाठीच नव्हे तर आपल्या अप्रतिम सौंदर्यासाठीही त्या ओळखल्या जात होत्या. ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी टीव्हीवर वारंवार प्रदर्शित होऊन तो घराघरात हिट झाला. सौंदर्याने कन्नड, तमिळ, हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. पण एका भीषण अपघातामुळे त्या कायमच्या जगाला राम राम करून गेल्या.
विमान अपघातात झाला अभिनेत्रीचा मृत्यू
‘सूर्यवंशम’मधून घराघरात ओळख मिळवणाऱ्या अभिनेत्री सौंदर्या यांचाही मृत्यू विमान अपघातात झाला. १७ एप्रिल २००४ रोजी ३२ वर्षीय सौंदर्या बंगळुरूच्या जक्कूर एअरफील्डवरून करीमनगरकडे जात होत्या. टेकऑफनंतर काहीच मिनिटांत विमान क्रॅश झाले आणि त्यात आग लागली. त्या वेळी सौंदर्या गर्भवती होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ अमरनाथ, भाजप कार्यकर्ता रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप्स हेही विमानात होते. या अपघातात सर्वांचा मृत्यू झाला.
सौंदर्याने साउथ इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला होता. त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट आले. साउथमध्ये एक काळ त्या रेखा-हेमा मालिनींना टक्कर देणाऱ्या होत्या. अमिताभ बच्चन यांची हीरोइन बनून त्यांनी घराघरात वेगळी ओळख निर्माण केली होती.
