
71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन 23 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. हा पुरस्कार 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना, लघुपटांना आणि इतर अनेक श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यांना दिला जात आहे. विशेष बाब म्हणजे, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा 1 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. सुपरस्टार शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळणार असल्याची घोषणा झाली होती. त्यांच्यासोबत विक्रांत मेसीला ‘12वीं फेल’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
71वा राष्ट्रीय चित्रपट सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी दिल्लीतील आयोजित करण्यात आला आहे. हा बहुप्रतिक्षित सोहळा आज विज्ञान भवनात पार पडला आहे. या सोहळ्याला मागच्या वर्षभरातील सर्वोत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि सिनेसृष्टीमधील प्रतिभावान लोक उपस्थित होते.
वाचा: अंकिता वालावलकरने सांगितलं सूरज चव्हाणच्या लग्नाचं सत्य, नेमकं काय म्हणाली?
विधु विनोद चोप्रा यांच्या ‘12वीं फेल’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळेल, तर ऑफबीट कॉमेडी ‘कटहल – ए जॅकफ्रूट मिस्ट्री’ याला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून सन्मानित केले जाईल. राणी मुखर्जीला ‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’ मधील तिच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळेल. तर साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
यापूर्वी पार पडलेल्या, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, अभिनेता ऋषभ शेट्टीला कन्नड ब्लॉकबस्टर ‘कांतारा’मधील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नित्या मेनन (‘थिरुचित्रंबलम’) आणि मानसी परेख (‘कच्छ एक्सप्रेस’) यांना विभागून देण्यात आला होता.