AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 इमेल आयडी, अनेक युट्यूब चॅनल्स; सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचं काय झालं?; कोर्टात नेमकं काय घडलं?

सलमान खान याचे चाहते सध्या चिंतेत दिसत आहेत. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. सततच्या धमक्यांमुळे सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

28 इमेल आयडी, अनेक युट्यूब चॅनल्स; सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचं काय झालं?; कोर्टात नेमकं काय घडलं?
Salman Khan
| Updated on: Jun 18, 2024 | 4:57 PM
Share

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. हेच नाही तर सलमान खान याच्या मुंबईतील घरावर 14 एप्रिलच्या पहाटे गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा आपल्या कुटुंबासोबत घरातच उपस्थित होता. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना गुजरातमधून ताब्यात घेतले.

लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून सलमान खानला वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळताना दिसत आहे. फक्त धमकीच नाही तर सलमान खान याच्या पनवेलच्या घराची रेकी देखील लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून अनेकदा केली गेली. नवी मुंबई येथून लॉरेन्स बिश्नोईच्या गँगच्या सदस्यांना पोलिसांकडून काही दिवसांपूर्वीच अटकही करण्यात आलीये.  

सलमान खान याला व्हिडीओच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केलीये. बनवारीलाल गुजर असे त्याचे नाव असून तो लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा सदस्य आहे. बनवारीलाल गुजर याला आता 20 तारखेपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिमांड संपल्यानंतर आज पुन्हा आरोपीला कोर्टात करण्यात आले होते.

आरोपी गुजरच्या मोबाईलमध्ये तब्बल 28  ईमेल आयडी सापडल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. ईमेल आयडीचा वापर करून आरोपीने अनेक यूट्यूब चॅनेल्स काढल्याचीही माहिती पुढे आलीये. आरोपी या ईमेल आयडीच्या माध्यमातून कोणकोणाच्या संपर्कात होता याचा तपास आता पोलिस करत आहेत. या प्रकरणात अजून काही मोठी खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.

हेच नाही तर धक्कादायक म्हणजे या आरोपीने सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराची संपूर्ण माहिती जमवून ठेवली होती. आता पोलिसांकडून या आरोपीची कसून चाैकशी केले जातंय. या प्रकरणात अजूनही काही नावे पुढे येऊ शकतात. सध्या सलमान खान याची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून केली जातंय. सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आलीये.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!