AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इरा खान भावूक, लग्नाला एक महिना होताच आमिरच्या लेकीची ‘ही’ पोस्ट, लोक हैराण, माझ्या आयुष्यात पाच…

Ira Khan Post News : आमिर खान याची लेक इरा खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. इरा खान हिची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच इरा खान हिने नुपूर शिखरे याच्यासोबत राजस्थान येथे शाही थाटात लग्न केले. मात्र, आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

इरा खान भावूक, लग्नाला एक महिना होताच आमिरच्या लेकीची 'ही' पोस्ट, लोक हैराण, माझ्या आयुष्यात पाच...
| Updated on: Feb 15, 2024 | 11:39 AM
Share

मुंबई : आमिर खान याची लेक इरा खान ही कायमच चर्चेत असते. नुकताच इरा खान हिचे लग्न नुपूर शिखरे याच्यासोबत अत्यंत शाही पद्धतीने राजस्थान येथे पार पडले. आता इरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाला जवळपास एक महिना झालाय. काल इरा खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. या पोस्टनंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. लग्न होऊन एक महिना झालेल्या असतानाच अशाप्रकारची पोस्ट ही इरा खान हिने शेअर केली.

आता परत एकदा इरा खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये इरा खान ही भावूक झाल्याचे बघायला मिळतंय. इरा खान हिने काही फोटोही या पोस्टसोबत शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना इरा खान हिच्या मनात बऱ्याच काही गोष्टी या सुरू असल्याचे बघायला मिळतंय.

इरा खान हिने आमिर खान याची एक्स पत्नी किरण राव हिचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये इरा खान ही किरण राव म्हणजेच तिच्या सावत्र आईची गळाभेट घेतना दिसत आहे. हे काही फोटो शेअर करत तिने म्हटले की, मला या आठवड्यामध्ये समजले की, मी खूप जास्त आभारी आहे की, माझ्या आयुष्यात असे पाच लोक आहेत.

ज्यांना मी कधीही बोलावू शकते. मला ज्यावेळी वाटेल त्यावेळी मी त्यांची गळाभेट घेऊ शकते. मला ज्यावेळी वाटेल त्यावेळी मी त्यांना कधीही काॅल करू शकते. जर तुम्हाला वाटले की, असे नाहीये..तर त्यांना शोधा…मग तुम्हाला जर वाटते की, असे कोणी लोकच तुमच्याकडे नाहीत. मग अशावेळी तुम्ही सरळ बाहेर पडा आणि कलेक्शन तयार करा.

मेडिकेशन किंवा थेरपी यांची जागा कोणी घेऊ शकत नाहीत. आता इरा खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. इरा खान हिच्या अशाप्रकारच्या पोस्ट पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. इरा खान हिच्या आयुष्यात काहीतरी सुरू असल्याची अंदाजा या पोस्टवरून लावला जातोय. इराच्या अशाप्रकारच्या पोस्ट पाहून लोक हैराण होताना दिसत आहेत.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?