
गेल्या काही दिवसांपासून सुपरस्टार धनुष लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अभिनेत्याचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने आयु्ष्यात पुढे जाण्याचे ठरवले. धनुष हा गेल्या काही दिवसांपासून एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता थेट त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धनुषने लग्न उरकल्याचे दिसत आहे. तसेच त्यांच्या लग्नाला अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावल्याचे देखील दिसत आहे.
सोशल मीडियावर धनुष आणि मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या लग्नाचा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दावा केला जात आहे की, दोघांनी २२ जानेवारी २०२६ रोजी चेन्नईत पारंपरिक दक्षिण भारतीय रीतिरिवाजांसह लग्न केलं. व्हिडीओमध्ये धनुष पांढरी लुंगी आणि गोल्ड बॉर्डर असलेल्या शर्टमध्ये दिसत आहेत, तर मृणाल ठाकूर मारून रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तमिळ सुपरस्टार थलापती विजय, दुल्कर सलमान, अजित कुमार, संगीतकार अनिरुद्ध रविचंदर, त्रिशा आणि श्रुती हासन यांसारखे मोठे कलाकारही उपस्थित असल्याचे दिसत आहे.
खरच दोघांनी लग्न केलं?
यापूर्वी दोघे 14 फेब्रुवारीला लग्न करणार आहेत अशा अफवा सुरु होत्या. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांमध्ये खळबळ उडाली. अनेक युझर्सनी याला खरं मानलं आणि म्हणाले की, दोघांनी गुपचुप लग्न केलं. काहींनी हे प्रायव्हेट सेरेमनी असल्याचं सांगितलं. पण हे खरं आहे का? जर तुम्हीही या लग्नाला खरं मानत असाल, तर तुम्ही चुकत आहात. कारण हा व्हिडीओ पूर्णपणे फेक आणि एआय जनरेटेड आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये सेलेब्सही दिसतात
व्हिडीओ जवळून पाहिल्यास हे स्पष्ट दिसतं की, हा व्हिडीओ खरा नाही. एका युझरने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, २२ जानेवारीला अजित कुमार दुबईत होते, मग ते लग्नात कसे उपस्थित असू शकतात? अनेक फॅक्ट-चेक रिपोर्ट्सनीही पुष्टी केली आहे की, हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बनवलेला आहे.
धनुष आणि मृणाल ठाकूर यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. दोघे व्हॅलेंटाइन डे म्हणजे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्न करणार आहेत आणि हे समारंभ खूप खासगी असतील असे म्हटले जात आहे. मात्र, नंतर स्टार्सच्या जवळच्या सूत्रांनी या बातम्या पूर्णपणे फेटाळल्या. दोघांनीही सांगितलं आहे की, ते फक्त मित्र आहेत, त्यापलीकडे काही नाही.
धनुष पुन्हा लग्न करणार?
धनुषच्या जवळच्या मित्र आणि सूत्रांनी माध्यमांना स्पष्ट केलं आहे की, अभिनेता पुन्हा लग्न करू इच्छित नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की, धनुष दोन मुलांचे – यात्रा आणि लिंगा – वडील आहेत आणि ते त्यांची जबाबदारी नीट पार पाडत आहेत. ते मुलांच्या आयुष्यात असा मोठा बदल आणू इच्छित नाहीत ज्याचा त्यांच्यावर परिणाम होईल.