Video: कोणीतरी तिला त्याच्यापासून लांब करा; 65 वर्षीय साऊथ सुपरस्टारने 17 वर्षीय मुन्नीला फोटोसाठी जवळ ओढले, नेटकरी संतापले

सध्या सोशल मीडियावर बजरंगी भाईजान सिनेमामध्ये मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्राची चर्चा रंगली आहे. तिला एका दाक्षिणात्य सुपरस्टारने ज्या प्रकारे जवळ ओढले ते पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Video: कोणीतरी तिला त्याच्यापासून लांब करा; 65 वर्षीय साऊथ सुपरस्टारने 17 वर्षीय मुन्नीला फोटोसाठी जवळ ओढले, नेटकरी संतापले
harshali malhotra
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 16, 2025 | 2:27 PM

बॉलिवूडमधील सुपरहिट सिनेमा ‘बजरंगी भाईजान’मधील ‘मुन्नी’ म्हणजेच हर्षाली मल्होत्रा 10 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. तिने अलीकडेच आपल्या कमबॅकची अधिकृत घोषणा केली होती. हर्षाली, दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते नंदमुरी बालकृष्णासोबत ‘अखंडा 2’मध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे गाणे ‘थांडवम’ लॉन्च करण्यात आले. एका कार्यक्रमात हे गाणे लॉन्च करण्यात आले आणि यावेळी अखंडा 2ची संपूर्ण टीम एकत्र दिसली. हर्षाली मल्होत्रा आणि नंदमुरी बालकृष्णा हेही या गाण्याच्या लॉन्च कार्यक्रमाचे भाग होते. दरम्यान, नंदमुरी बालकृष्णांनी हर्षालीसोबत असे काही कृत्य केले, जे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्याच्या कृत्यावर संतापले नेटकरी

गाणे लाँच कार्यक्रमादरम्यान हर्षाली मल्होत्रा, नंदमुरी बालकृष्णासोबत स्टेजवर उभी होती. याच वेळी, फोटो काढण्यासाठी नंदमुरींनी हर्षालीचा हात पकडून तिला आपल्या बाजूला ओढले. त्यांच्या या कृत्यामुळे हर्षाली थोडी अस्वस्थ झाल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या एका व्हिडीओतही नंदमुरी तिला आपल्या बाजूला उभे राहण्यास सांगतात आणि हर्षालीच्या चेहऱ्यावर तीच अस्वस्थता पुन्हा दिसते. आता सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटकरी प्रतिक्रिया देत नंदमुरींच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच अनेकांनी हर्षालीला त्यांच्यापासून लांब ठेवण्यास सांगत आहेत.

Munni needs help
byu/saurabhagarwal8 inBollyBlindsNGossip

नंदमुरी बालकृष्णांचे वर्तन नेटकऱ्यांना आवडले नाही

नंदमुरी आणि हर्षालीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘कृपया… कोणीतरी तिला त्याच्यापासून लांब करा’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘हर्षालीच्या चेहऱ्यावर हसू आहे, पण डोळ्यांत अस्वस्थता आणि भीती स्पष्ट दिसत आहे.’ आणखी एकाने लिहिले- ‘तिला असे ओढत आहेत, जणू काही फर्निचर आहे.’

10 वर्षांनी कमबॅक

अलीकडेच हर्षाली मल्होत्राने सोशल मीडियाद्वारे आपल्या कमबॅकची घोषणा केली होती. सुपरस्टार सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’मध्ये मुन्नीची भूमिका साकारून तिने खूप वाहवा मिळवली होती. या चित्रपटात तिने एका पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली होती, जिची आई तिला भारतात घेऊन येते आणि ती येथे हरवते. या चित्रपटानंतर हर्षालीने अभिनयापासून अंतर ठेवले होते, पण सोशल मीडियाद्वारे सतत चाहत्यांशी जोडलेली राहिली. आता जेव्हा हर्षाली कमबॅक करत आहे, तेव्हा तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूप आनंदाची आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत सिल्व्हर स्क्रीनवर कमबॅकबद्दल आनंद व्यक्त केला. हर्षालीचा आगामी चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. हा एक तेलुगू चित्रपट आहे, जो हिंदीसह इतर भाषांमध्ये डब करून रिलीज केला जाईल.