AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरोप घेताना आमिरच्या लेकीला अश्रू अनावर; बापाला मिठी मारली अन्, इरा खानचा व्हिडीओ व्हायरल

आमिर खानची मुलगी इरा खानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, इरा तिच्या वडिलांना भेटल्यानंतर खूप भावनिक होताना आणि रडताना दिसत आहे. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

निरोप घेताना आमिरच्या लेकीला अश्रू अनावर; बापाला मिठी मारली अन्, इरा खानचा व्हिडीओ व्हायरल
Ira Khan Tears Up After Visiting Aamir KhanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 5:11 PM
Share

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोन घटस्फोटानंतर आता पुन्हा तिसरं अफेअर समोर आल्यानंतर आमिर खानला खूप ट्रोल केलं जात आहे. आमिर खानची नवीन गर्लफ्रेंड ‘गौरी प्रॅट’चे फोटो व्हायरल होत आहेत. पण आता आमिर खान पुन्हा एकदा एका व्हिडीओमुळे आता चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे त्याची लेक इरा खान.

वडिलांचा निरोप घेताना इराला अश्रू अनावर 

इरा खानचे 17 मार्च रोजी इरा ही वडील आमिर खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती. त्याला भेटल्यानंतर ती जेव्हा घरातून बाहेर आली तेव्हा पापाराझींनी तिला रडताना स्पॉट केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिने गेल्या वर्षी 2024 मध्ये फिटनेस कोच नुपूर शिखरसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर अनेक दिवसांनी इरा आमिर खानच्या घरी येताना दिसली. तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये इरा खान गाडीत बसलेली दिसत होती. या वेळी त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते.

पापाराझींकडून इराचा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद

@viralbhayani या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आमिर खान आणि त्याची लेक गाडीत बसण्याआधी एकमेकांना भेटताना दिसतात. त्यावेळी ते कोणत्या तरी विषयावरही बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर गाडीत बसताना इराला तिचे अश्रू अनावर झाले अन् ती रडू लागली. पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच इराने वडिलांना मिठीही मारली आहे.

तसेच त्यानंतर आमिर लेकीला काहीतरी समाजवत तिला गाडीत बसवताना दिसत आहे. आमिरच्या घरातून बाहेर पडताना इरा खूप भावनिक दिसत होती. ती तिचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना दिसली. जेव्हा पापाराझींनी इराचा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला.

सेलिब्रिटींनाही प्रायव्हसी देण्याची चाहत्यांची विनंती 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहतेही इराच्या या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले आहे ‘त्यांना थोडीपण प्रायवेसी का मिळत नाही? कारण ते सेलिब्रिटी आहेत म्हणून? ते देखील मानव आहेत हे विसरू नका.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘तिला एकटं सोडा तिला सध्या शांत राहण्याची गरज आहे, यात काय टीआरपी?” अशापद्धतीने चाहत्यांनी पापाराझींना सेलिब्रिटींचाही प्रायव्हसी जपण्याची विनंती केली आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.