AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ira Khan : ‘बाबांसोबतचं नातं कॉम्प्लिकेटेड’; आमिर खानची मुलगी असं का म्हणाली?

आयरा खान ही आमिर आणि रिना दत्ता यांची दुसरी मुलगी आहे. आयराला मोठा भाऊ असून त्याचं नाव जुनैद असं आहे. आमिर खान आणि रिना दत्ता यांनी 18 एप्रिल 1986 रोजी लग्न केलं होतं. 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमिरने किरण रावशी लग्न केलं.

Ira Khan : 'बाबांसोबतचं नातं कॉम्प्लिकेटेड'; आमिर खानची मुलगी असं का म्हणाली?
Aamir Khan with daughter Ira KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 20, 2023 | 2:49 PM
Share

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. आयराने विविध मुलाखतींमध्ये तिच्या मानसिक आरोग्याविषयी खुलासा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती पालकांसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली. माझे आईवडील नेहमीच माझ्या कठीण काळात सोबत होते, पण त्यांच्यासमोर मोकळेपणे बोलणं कठीण होतं, असं आयरा म्हणाली. नैराश्यातून बाहेर पडण्याच्या मार्गातील हा सर्वांत मोठा अडथळा सुरुवातीच्या काळात निर्माण झाल्याचं तिने सांगितलं.

‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरने 2022 पासून काही काळ ब्रेक घेतला. करिअरच्या मागे धावताना कुटुंबीयांसोबत पुरेसा वेळ घालवता आलाच नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली होती. लहानपणी तुला वडिलांसोबत पुरेसा वेळ घालवायला नाही मिळाला आणि त्यामुळे तुमच्या नात्यावर काही परिणाम झाला का, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर आयरा म्हणाली, “माझ्या आई-वडिलांसोबतच्या चांगल्या नात्यासाठी मी सतत प्रयत्न करतेय. कारण पालकांसोबतचं नातं हे तुमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचं आणि गहिरं नातं असतं.”

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

याविषयी आयरा पुढे म्हणाली की, “कोणाचंही त्यांच्या आईवडिलांसोबतचं नातं सर्वांत गुंतागुंतीचं असतं कारण तुम्हाला त्यांच्या वक्तव्यांची जास्त काळजी असते. या गोष्टीला फार वेळ लागतो. पण त्यातून तुम्हाला सर्वाधिक आनंदसुद्धा मिळतो.” नैराश्याचा सामना करताना आयराला तिच्या आई-वडिलांसोबतच्या नात्यावर अधिक काम करण्याचा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला होता.

आईवडिलांसोबत आता कसं नातं आहे, याविषयी बोलताना आयराने सांगितलं, “माझ्या मते वडिलांपेक्षा आईसोबत संवाद साधणं आता थोडंसं सोपं आहे. पण मी दोघांशी उघडपणे बोलू शकते. माझ्या डोक्यात सतत असा विचार असतो की माझे वडील कदाचित व्यस्त असतील. जरी त्यांनी मला असं सांगितलं की कधीही गरज असेल तेव्हा कॉल कर. तरीसुद्धा मला असंच वाटतं की ते त्यांच्या कामात असतील. पण सध्या माझी आईसुद्धा व्यस्त आहे, कारण तिला तिच्या पालकांची काळजी घ्यायची आहे.”

26 वर्षीय आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ताची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी साखरपुडा केला. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.