AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Rao : लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं नॉर्मल…आमिर खानची एक्स पत्नी किरण रावचं वक्तव्य, नव्या पिढीबद्दल काय म्हणाली?

Aamir Khan Ex Wife Kiran Rao : आमिर खानची एक्स पत्नी किरण रावनं नुकत्याच एका मुलाखतीत नव्या पिढीबद्दल भाष्य केलं असून नातेसंबंधनाबद्दलही मत व्यक्त केलं आहे.

Kiran Rao : लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं नॉर्मल...आमिर खानची एक्स पत्नी किरण रावचं वक्तव्य, नव्या पिढीबद्दल काय म्हणाली?
| Updated on: Oct 04, 2026 | 9:25 PM
Share

आमिर खानची एक्स पत्नी आणि निर्माती किरण राव यांनी, आधीच्या पिढीबद्दल आणि आताच्या पिढीबद्दल भाष्य केलं आहे. ‘लस्ट स्टोरीज ३’ च्या प्रमोशनदरम्यान एका विशेष मुलाखतीत त्या म्हणाल्या की, तरुण पिढीमध्ये स्वातंत्र्याची भावना आहे. तसेच किरण राव यांनी आजच्या शारीरिक संबंधांच्या मुद्द्यावरही आपलं मत व्यक्त केलं आहे. किरण राव यांना विचारण्यात आलं की, ‘किरण, तुमच्या कथेतील पात्रं तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करतात. तुमचं यावर काय मत आहे? जेव्हा तुम्ही याकडे निर्मात्याच्या दृष्टिकोनातून आणि एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पाहता? त्यावेळी तुम्हाला काय वाटतं?

किरण राव यांचं वक्तव्य

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत किरण राव म्हणाल्या की, त्या ‘frivolous’ या शब्दाऐवजी ‘मुक्त’ हा शब्द वापरण्यास प्राधान्य देतात. किरण यांनी पुढे सांगितलं की, पूर्वी लोकांकडून एका विशिष्ट प्रकारचे नातेसंबंध ठेवण्याची अपेक्षा केली जायची, पण आज तसं नाहीये. ‘मला स्वातंत्र्याची भावना जाणवते. माझ्या पिढीच्या तुलनेत आजच्या तरुण पिढीमध्ये स्वातंत्र्याची भावना आहे. म्हणजे, जग बदललं आहे आणि स्वतःला व्यक्त करण्याचे मार्ग खूप वेगळे आहेत, आणि आम्हाला हेच जाणून घ्यायचं होतं. कोणत्याही बंधनांपासून मुक्त असलेले दोन तरुण एकमेकांकडे आकर्षित होतात. पुढे काय होतं? आणि जेव्हा ते काही विशिष्ट निर्णय घेतात, तेव्हा कोणत्या अनपेक्षित गोष्टी घडतात.’ असं किरण म्हणाल्या.

किरण पुढे म्हणाल्या की, ‘मला वाटतं की, हे मजेशीर आहे. कारण माझ्या काळात, अशी अपेक्षा होती की, तुमचं कोणासोबतचं नातं एका विशिष्ट प्रकारचं असेल, एकतर शारीरिक संबंध, किंवा ठरवून केलेल्या लग्नानंतरचं भावनिक नातं. पण आता तसं नाही.’

नात्यांमधील बदलांबद्दल बोलताना, किरण राव म्हणाल्या की, ‘लोकांचे लग्नाआधीच शारीरिक संबंध असतात, हे आजकाल नॉर्मल झालंय. एकेमेकांसोबत भावनिक नातं असतं. आजचं जग असंच आहे. आम्ही हे जग डोळ्यासमोर ठेवून ही कथा तयार केली आणि मला वाटतं की, आम्हाला असं काहीतरी हवं होतं जे आजच्या तरुण पिढीमध्ये असलेला ताजेपणा आणि स्वातंत्र्य प्रतिबिंबित करेल.’

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात