
बॉलिवूडचा सुपरस्टार अन् मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्यांच्या कामामुळे, त्याच्या भुमिकांमुळे अन् त्याच्या चित्रपटाच्या निवडीमुळे नेहमीच चर्चेत असतो. तसेच आमिर खान त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे पण कायम चर्चेत असतो. अनेकदा त्याने मुलाखतींमध्ये त्याच्या नात्यांपासून ते त्याच्या वाईट सवयींपर्यंत सगळ्यांबद्दल अगदी उघड उघड चर्चा केलेली आहे. त्याने अनेकदा त्याला लागलेल्या वाईट व्यसनांबद्दलही सांगितलं आहे.
दिवसाला 100 पान खात असे
तसेच आमिर खानला अजून एका गोष्टीचं व्ससन आहे आणि ते म्हणजे भूमिकांपासून ते पात्र रंगवण्यापर्यंत सर्व काही परफेक्टच व्हायला हवं. त्यासाठी तो कितीही मेहनत करायला तयार असतो. याचमुळे त्याला दिवसाला 100 पान खावे लागले आहेत. एका भूमिकेसाठी तो चक्क दिवसाला 100 पान खात असे. कोणत्याही वाईट सवयीमुळे किंवा व्यसनामुळे तो असे करत नव्हता. तर त्याच्या एका पात्राला परिपूर्णता आणण्यासाठी करत होता. हा चित्रपट म्हणजे 2014 मध्ये प्रदर्शित झालेला त्याचा ‘पीके’ चित्रपट. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.
आमिर दिवसाला 100 पान का खात असे?
या चित्रपटात आमिर खानने एका परग्रही व्यक्तीची म्हणजे एलिअनची भूमिका केली आहे. त्याच्या ग्रहावरून पृथ्वीवर येतो. परंतु नंतर तिथेच अडकतो. त्याच्या शक्तींचा वापर करून, तो स्थानिक लोकांच्या भाषा आणि चालीरीती तसेच त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली शिकतो. त्यातच त्याचे पात्र नेहमीच पान, सुपारी खातानाचं दाखवण्यात आलं आहे. याच त्याच्या पात्राला न्याय देण्यासाठी आमिर खानला दररोज पान खावे लागत असे. आमिर खानने स्वतः एका मुलाखतीत याबद्दल सांगितले.
सेटवरच पान विक्रेत्याला बोलावून घेण्यात आलं होतं?
आमिर खानने खुलासा केला की या भूमिकेसाठी तो दिवसाला 100 पान खात असे. त्यासाठी सेटवर नेहमीच एक पान विक्रेता उपस्थित असायचा जो त्याच्यासाठी नेहमी पान बनवत असे. आमिर खानला त्याच्या पात्राचे ओठ नैसर्गिकरित्या लाल ठेवायचे होते आणि पानाचा नैसर्गिक भाव आणि उच्चारण साध्य करायचे होते, म्हणून तो भूमिकेत असताना सतत पान खात असायचा. पण त्याची मोठी किंमत मोजावी लागली. सतत पान खाल्ल्याने आमिर खानच्या तोंडात अल्सर झाले आणि त्याचा त्याला खूप त्रासही झाला होता.
चित्रपटाचे बजेट आणि एकूण कमाई
पण तरीही, त्याने त्याच्या व्यक्तिरेखेला आणि सीनला खरा अनुभव देण्यासाठी पान खाणे सोडेल नाही. चित्रपटात आमिर खानची सहकलाकार असलेली अनुष्का शर्माने त्याच मुलाखतीत सांगितले होते की आमिर खानची जी अवस्था व्हायची ते पाहून तिला फार वाईट वाटायचे, कारण आमिर खानला आवड असो नसो त्याला पान खावे लागत असे आणि दिवसभर त्याच्या तोंडात पान राहायचे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाचे बजेट 85 कोटी होते. पण चित्रपटाने 122 कोटी रुपये कमावले. चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.