नो मेकअप, नो ग्लॅमर, फक्त पांढरा शर्ट अन…. नेहमी ‘अप टू डेट’ राहणारी प्राजक्ता माळी रेड कार्पेटवर भलत्याच अवतारात पोहोचली; पाहून सगळेच थक्क
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते, परंतु नुकत्याच एका सोहळ्यात जिथे सर्व सुंदर लूक करून आले होते तिथे ती 'नो-मेकअप' लूक अन् अत्यंत साध्या अवतारात पोहोचली होती की तिला पाहून सर्वांनाच धक्का बसला. तिच्या या साध्या लूकमुळे चाहते थक्क झाले. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. तिच्या या व्हायरल व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असेलेली प्राजक्ता माळी नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तसेच प्राजक्ता माळी तिच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल, तिच्या व्यवसायाबद्दल तसेच तिच्या ग्लॅमरस लूकबद्दल नेहमीत चर्चेत असते. प्राजक्ताने मालिकांमधून, चित्रपटांमधू, वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. ‘फुलवंती’ नंतर तर तिचा चाहता वर्ग फार वाढला आहे. तसेच प्राजक्ता तिच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दलही फार चर्चेत असते.
हटके लूकमुळे प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत
प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिच्या हटके लूकमुळे. एका सोहळ्यात नेहमी ग्लॅमरस अंदाजात राहणारी प्राजक्ता सिंपल पांढरा शर्ट आणि जीन्समध्ये आलेली दिसली. तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. काहींनी तिचं कौतुक तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. कारण तो सोहळा ‘बाप तुझ्यापायी’ या वेब सीरिजचा प्रीमियर सोहळा. हा कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. त्यावेळी सर्व कलाकारांनी हजेरी लावली होती.
पांढऱ्या रंगाचा साधा शर्ट अन् जीन्स
यावेळी रेड कार्पेटवर उपस्थित असलेले कलाकार पारंपारिक लूकमध्ये, नटून-थटून आले असताना प्राजक्ता माळी मात्र अगदीच साध्या-सिंपल लूकमध्ये आली होती. कोणत्याही कार्यक्रमाला जाताना पारंपरिक साडीमध्ये किंवा खास डिझायनर ड्रेसमध्ये उपस्थित राहणाऱ्या प्राजक्ताने यावेळी तिच्या लूकमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. प्राजक्ता यावेळी पूर्णपणे नो मेकअप लूक, पांढऱ्या रंगाचा साधा शर्ट अन् जीन्समध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. तिच्या अत्यंत साध्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि आता सोशल मीडियावर तिची जबरदस्त चर्चा सुरू आहे.
“मी आज अशा अवतारात आले आहे !”
तिचा हा साधा लूक पाहताच फोटोग्राफर्सही थक्क झाले. जेव्हा प्राजक्ताला याबद्दल विचारले गेले तेव्हा तिने हसत उत्तर दिले की, “मी आज अशा अवतारात आले आहे !” तिच्या या बिनधास्त आणि प्रामाणिक उत्तराला तेथे उपस्थित असलेल्या मीडियानेही पसंती दर्शवली. हे सर्व व्हिडिओमध्ये कैद झाले आणि आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या साध्या लूकबद्दल तिने स्वत:च गंमत केली पण जिथे सर्वजण सुंदर लूक करून आले होते तिथे प्राजक्ताने तिचा जो साधेपणा अन् नॅच्यूअरल लूक दाखवला त्याबद्दल सर्वांनी तिचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
काहींनी केलं ट्रोल
एरवी ग्लॅमरस भूमिकेत दिसणाऱ्या प्राजक्ताचा हा साधा-सिंपल अवतार चाहत्यांना खूपच आवडला आहे. पण काहींनी तिला याबद्दल ट्रोलही केलं आहे. नेहमी ग्लॅमर लूकमध्ये दिसणारी ही प्राजक्ता या सोहळ्याला असं येण्याचं काय कारण असं म्हणत काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास…
प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ती शेवटची ‘फुलवंती’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट तुफान हिट ठरला. या चित्रपटात तिने केवळ मुख्य भूमिकाच साकारली नाही, तर निर्मितीची जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली. सध्या ती सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.तसेच तिचे ट्रॅव्हलिंगही सुरु आहे.
